स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे बुलढाण्याहून
बुलढाण्याच्या 19 वर्षीय प्रथमेश जावकरने जागतिक तिरंजादी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. अटीतटीच्या या सामन्यात त्याने नेदरलँडच्या माईक श्र्लोएसवर मात करत शांघाई येथे सुरु असलेल्या स्पर्धेत हे यश मिळविले. ही स्पर्धा जिंकल्यानंतर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शालेय जीवनापासूनच तो वेगवेगळ्या तिरंजादी स्पर्धेत चमकत आहे. जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या खेळाडूला हरवणे नक्कीच सोपे नव्हते. मात्र प्रथमेशने 149-148 या फरकाने सामना जिंकत आपले पहिले सुवर्णपदक जिंकले.
यासाठी प्रथमेश जावकरने बुलढाण्यात राहुनच तयारी केली. शाळेत असतानाच त्याला तिरंजादीत आवड होती. त्याने छत्तीसगडमध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत चांगली कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले होते. येथून सुरुवात करत त्याने अवघ्या 19व्या वर्षीच जागतिक स्पर्धा जिंकली.
ओजस देवताळे याची सुवर्णपदक विजेती कामगिरी
ओजस देवताळे आणि ज्योति सुरेखा वेनम यांनी या जागतिक स्पर्धेत दुहेरी प्रकारात सलग दोन वेळा सुवर्ण पदक जिंकले. त्यांनी कोरियाच्या किम जोंघो आणि चोई योंगही या जोडीचा पराभव केला. त्यांनी शेवटचा सामना 156-155 या फरकाने जिंकत सुवर्णपदक पटकावले. हा सामनाही चागंलाच रंगला होता. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात कोरियाच्या संघाने 38 अंक मिळवले तर भारताने 39 अंक मिळवत हा सामना जिंकला.
———-
‘सावरकर ते शिरवाडकर’ सांगीतिक कार्यक्रमाचे आज आयोजन
मराठी राज्यभाषा दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘सावरकर ते शिरवाडकर’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणाऱ्या अनमोल रत्नांचा माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते या प्रसंगी सन्मान केला जाणार आहे.
पुणे पुस्तक महोत्सव आयोजित आणि संवाद, पुणेची निर्मित गीत-संगीत, अभिवाचन, कविता, पोवाडा यांचा समावेश असलेला कार्यक्रम आज (26 फेब्रुवारी) सायंकाळी 5:30 वाजता पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या प्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि संवाद, पुणेचे सुनील महाजन यांनी दिली आहे.
यावेळी मराठी भाषेला वैभव प्राप्त करून देणारे ज्येष्ठ कवी, लेखक फ. मुं. शिंदे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे यांचा माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.
————-
‘नो जात, नो धर्म’ प्रमाणपत्र मिळवणारी तामिळनाडूची महिला ठरली पहिली भारतीय
तामिळनाडूतील वेल्लोर येथील ३५ वर्षीय वकील स्नेहा पार्थिवराजा ९ वर्षांच्या लढाईनंतर ‘नो जात, नो धर्म’ प्रमाणपत्र मिळवणारी पहिली भारतीय ठरली आहे.
१९५० मध्ये जातिव्यवस्था कायदेशीररित्या रद्द झाली असेल, परंतु जर तुम्ही भारतात राहत असाल, तर ‘जात’ आणि ‘धर्म’ भरण्यासाठीचा बॉक्स अजूनही अनेक फॉर्ममध्ये असतो. फॉर्मवरील यापैकी काही बॉक्स अनिवार्य देखील आहेत. तथापि, तामिळनाडूतील, स्नेहाला आता कोणत्याही स्वरूपात उत्तरे न देणे निवडता येईल कारण तिला अधिकृतपणे ‘कोणतीही जात नाही, धर्म नाही’.
स्नेहा अशा कुटुंबात वाढली जिथे ती कोणत्याही जातीवर किंवा धर्मावर विश्वास ठेवत नव्हती. तिच्या सर्व प्रमाणपत्रांमध्ये, जन्म आणि शाळेच्या प्रमाणपत्रांसह, “जात” आणि “धर्म” रकान्यांसमोर शून्य किंवा रिक्त आहेत.
पार्थिवराजाने २०१० मध्ये तिचा लढा सुरू केला, पण तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, कारण अधिकारी सहसा देशात असा कोणताही पूर्वग्रह नसल्याच्या आधारावर नकार देत असत . २०१७ मध्ये स्नेहाने तिचा शेवटचा अर्ज सादर केला आणि अधिकाऱ्यांना तिची भूमिका स्पष्ट केली. तिने सांगितले की तिला कोणत्याही सरकारी योजना किंवा निर्बंधांचा लाभ घ्यायचा नाही, म्हणून तिची विनंती मान्य करावी. अखेर तिरुपत्तूरच्या उपजिल्हाधिकारी बी. प्रियंका पंकजम यांनी तिला ‘ना जात, ना धर्म’ ओळख प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला.
कमल हसन यांनी ट्विटरवर तिचे अभिनंदन केले की अखेर तिच्या ओळखीशी कोणतीही जात किंवा धर्म जोडलेला नाही.