• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

हजारो दिव्यांनी उजळली हास्यमने!!

Admin by Admin
November 15, 2024
in my news pune
0
हजारो दिव्यांनी उजळली हास्यमने!!

चतु:श्रृंगी मंदिरात रंगला दीपोत्सव

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची प्रकाशमान बातमी आहे पुण्यातून…

हजारो दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशाने चतुःशृंगी मंदिराचे प्रांगण उजळून निघाले. शेकडो हास्यमनांनी या दीपोत्सवाचा भरभरून आनंद घेत ताण नावाचा अंधार मनातून दूर केला.

त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून नवचैतन्य हास्ययोग परिवार व चतुःशृंगी देवस्थान समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. चतुःशृंगी मंदिराच्या प्रांगणात रचनात्मक पद्धतीने प्रज्वलित केलेल्या दिव्यांचा लखलखाट पाहायला मिळाला. आनंदी व हास्यमय जीवन जगण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे नायक अनुपसिंग ठाकूर, निर्माते केतनराजे भोसले व टीमसह स्वदेस न्यूजचे मुख्य संपादक पराग पोतदार, किशोर सरपोतदार, ज्येष्ठ पत्रकार स्वाती महाळंक, लिज्जत पापड चे सुरेश कोते, एकपात्री कलाकार चैताली माजगावकर भंडारी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दीपोत्सवावेळी नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे, मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजयराव भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, हरीश पाठक, जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे यांच्यासह नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे सदस्य व मंदिर देवस्थानाचे विश्वस्त श्रीकांत अनगळ, नंदकुमार अनगळ, सुहास अनगळ, डॉ. विनायक देडगे यांची उपस्थिती होती.

यावेळी अभिनेता अनुपसिंग ठाकूर म्हणाले, “मागील वर्षी मी चतुःश्रृंगी मातेचे दर्शन घेतले आणि हा चित्रपट सुरू केला. हा चित्रपट प्रदर्शित होताना आईच्या दर्शनासाठी मी पुन्हा आलो आहे. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाची भूमिका साकारायला मिळणे, हा मातेचा आशीर्वाद आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार खूप चांगले काम करत आहे. मला या परिवाराचा आणि तुम्ही केलेल्या कामाचा हेवा वाटतो.”

मकरंद टिल्लू म्हणाले, “आम्ही गेल्या अकरा वर्षांपासून हा दीपोत्सव करतो. या माध्यमातून आम्ही सर्व ज्येष्ठांना व तरुणांना हास्यमय जीवन जगण्याचा संदेश देतो. या परिवारामध्ये पंचवीस हजाराहून अधिक ज्येष्ठ नागरिक सहभागी आहेत. या दीपोत्सवाच्या माध्यमातून ताण-तणावाच्या अंध:कारातून बाहेर पडण्यासाठी आपण हास्याचे दिवे प्रज्वलित करूया आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये आनंद पेरूया.”

यावेळी पराग पोतदार म्हणाले, मनामनातील अंधकार दूर करण्याचे काम दीपोत्सवातून होते. आज आपल्या आजूबाजूला वैचारिक दारिद्र्याचा अंधकार आहे. स्वतःची मले उजळताना हा अंधकारही दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
दीपोत्सवाचे आरेखन विजयराव भोसले यांच्या संकल्पनेतून केले होते. संपूर्ण सप्तशृंगी मंदिराचा परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला होता.

Previous Post

स्वर्गारोहण मार्गावर अवतरले पाच पांडव व द्रौपदी

Next Post

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच ट्रॅकवर!

Admin

Admin

Next Post
भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच ट्रॅकवर!

भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच ट्रॅकवर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.