• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

सहावीतील विराज देसाईने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प !

Admin by Admin
May 22, 2025
in Success Story
2
सहावीतील विराज देसाईने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प !

* मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुनियेत हरविलेल्या मुलांना देतोय साहसाचा संदेश

स्वदेस न्यूज ( प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी पुण्याहून

आजकाल अनेक लहान मुले तासनतास मोबाईल, सोशल मीडिया आणि व्हिडीओ गेम्समध्ये गुंतलेली दिसतात. या पिढीतलाच प्रेमनगर सोसायटी, मार्केटयार्ड येथे राहणारा आणि संस्कृती स्कूल, उंडी येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विराज देसाई या मुलाने नुकताच हिमालयातील एव्हरेस्ट बेस कॅम्प (५३६४ मीटर) यशस्वीरीत्या सर केला आहे. हे फक्त साहसच नाही, तर समवयस्क मुलांना प्रेरणा देणारा एक संदेश आहे.
ही अत्यंत आव्हानात्मक मोहीम एस. एल. अॅडव्हेंचर या संस्थेद्वारे आयोजित करण्यात आली होती. एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक सुमारे १३० किलोमीटर (एकूण फेरी) अंतराचा असून, यामध्ये तापमान कधी कधी १५ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. या ट्रेकमध्ये शरीराने उंचीला अनुकूल होण्यासाठी विश्रांती घेणे अत्यावश्यक असते. कारण जसे जसे उंची वाढते, तसे ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत जाते. यामुळे अॅक्यूट माऊंटन सिकनेस (एएमएस) होण्याचा धोका असतो. या सर्व आव्हानांचा सामना करत विराजने ही मोहीम अतिशय संयमाने व धैर्याने पूर्ण केली.


या मोहिमेसाठी गिर्यारोहक लहू उगाडे यांनी त्याला प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. विराज देसाई याने आजवर सह्याद्रीतील २५ पेक्षा अधिक सहज ते अत्यंत कठीण गिरिभ्रमण मोहिमा यशस्वीपणे पार केल्या आहेत. केवळ ८व्या वर्षी त्याने १८०० फूट उंच कोकणकडा येथे यशस्वी रॅपलिंगही केले होते. विराज देसाई हा केवळ गिर्यारोहकच नाही, तर एक बहुआयामी खेळाडू आहे. त्याला स्पोर्ट्स क्लाइम्बिंगमध्ये राजे शिवाजी क्लाइम्बिंग वॉल, पुणे येथे अमोल जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळाले आहे. तसेच त्याने लाठी-काठी व शिवकालीन युद्धकला यामध्येही प्रावीण्य मिळवले असून, गनिमी कावा शिवकालीन युद्धकला संकुल,
तळजाई येथे केशव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तो नियमित सराव करतो.
शारीरिक क्षमतेसोबतच मानसिक स्थैर्य टिकविण्यासाठी विराज शास्त्रीय संगीताचेही शिक्षण घेत आहे. मंजिरी खांडेकर (विबवेवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा संगीत अभ्यास सुरू असून, हे प्रशिक्षण त्याला ताण-तणावातून बाहेर पडण्यासाठी एक प्रभावी साधन ठरते आहे.
आजच्या डिजिटल युगात, विराजसारखा मुलगा साहस, कला आणि शिस्त यांच्या जोरावर एक नवा आदर्श ठरतो आहे. त्याचे हे यश इतर मुलांनाही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

Previous Post

अ‍ॅसिड हल्ल्यात डोळे गमविलेल्या कैफीने बारावीत मिळविले 95.6%

Next Post

जुन्या टायर पासून ती बनवते चपला!

Admin

Admin

Next Post
जुन्या टायर पासून ती बनवते चपला!

जुन्या टायर पासून ती बनवते चपला!

Comments 2

  1. Sushil Suresh Potdar says:
    1 year ago

    Abhinandan

    Reply
  2. Piyush shah says:
    1 year ago

    Khup bhari….. inspiration to all of us specially kids

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.