• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

‘एचआयव्ही’बाधित अनाथ तरुण-तरुणी जीवनभरासाठी वचनबद्ध!

Admin by Admin
May 31, 2025
in Positive news
0
‘एचआयव्ही’बाधित अनाथ तरुण-तरुणी जीवनभरासाठी वचनबद्ध!

* ममता फाउंडेशनमध्ये रंगला विवाह सोहळा

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

जन्मतःच ‘एचआयव्ही’सारखा गंभीर आजार, कुटुंबाने साथ सोडल्याने अनाथ उपेक्षितच जगणे पदरी आले. मात्र, ममता फाउंडेशन संस्थेने आधार दिला, सांभाळ केला, शिक्षणही दिले. त्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहिलेले तरुण-तरुणी सुखी आनंदी आयुष्याची स्वप्ने साकारण्यासाठी लग्नबंधन स्वीकारून एकमेकांची साथ देण्यासाठी वचनबद्ध झाले.

ममता फाउंडेशनने आधार दिल्यानंतर आता या मुलांना समाजानेही पूर्णपणे स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे. ‘एचआयव्ही’ बाधित अनाथ उपेक्षितांचा सांभाळ करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी ममता फाउंडेशन संस्थेची स्थापना २००८ मध्ये डॉ. शिल्पा बुडूख आणि अमर बुडूख यांनी केली. सुरुवातीला भाड्याच्या जागेत सुरू असलेल्या संस्थेला माजी नगरसेवक प्रकाश कदम यांनी तीन गुंठे मोफत जागा दिली आणि संस्थेने स्वतःची इमारत उभारली. या संस्थेतील दोन जोडप्यांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पार पडला. या संस्थेतील बधू रूपाली व वर महेश आणि वधू दिव्या व वर आकाश यांचा शुभविवाह नुकताच पारंपरिक पद्धतीने उत्साहात पार पडला.
हळद, मेंहदी, बॅन्डने वातावरण प्रसन्न झाले होते.

यावेळी ममता फाउंडेशनच्या संचालिका डॉ. शिल्पा बुडूख म्हणाल्या, अनाथ, उपेक्षितांना ममता परिवाराने हक्काचे घर दिले. अंगाखांद्यावर खेळवलेली माझी लेकरं आज विवाहबंधनात अडकली. कन्यादान सोहळा आनंदाश्रूनी पार पाडला. या सोहळ्यामुळे खऱ्या अथनि संस्था स्थापनेचे सार्थक झाले असल्याचे मला वाटत आहे. उपेक्षित म्हणून बेवारस झालेल्या लेकरांची माय मी यापूर्वीच झाले असून, आज मला सून आणि जावईदेखील आले आहेत.

या विवाह सोहळ्यास माजी नगरसेवक प्रकाश कदम, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, माजी सरपंच दीपक गुजर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर, संगीता यादव, शरद सोनवणे, आरोग्य निरीक्षक प्रमोद ढसाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. दिलीप जगताप यांनी केले.

Previous Post

संरक्षण सज्जतेत भारताचा दमदार स्वदेशी बाणा…! लढाऊ विमाने बनवणार

Next Post

नागपूर बनवणार आता अद्ययावत हेलिकॉप्टर

Admin

Admin

Next Post
नागपूर बनवणार आता अद्ययावत हेलिकॉप्टर

नागपूर बनवणार आता अद्ययावत हेलिकॉप्टर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.