• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

फूड स्कॉलरशिपने मिळणार गरजू विद्यार्थ्यांच्या पोटाला आधार*p

महाविद्यालयाचा महत्वाचा निर्णय

Admin by Admin
August 5, 2026
in my news pune
0
फूड स्कॉलरशीपने मिळणार गरजू विद्यार्थ्यांच्या पोटाला आधार
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

 

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

शिक्षणासाठी गावावरून शहरात (विशेषतः पुण्यात) आलेल्या तसेच अनाथ, सिंगल पेरेन्ट्स आणि आर्थिक परिस्थिती नसलेल्या गरजू विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन ‘फूड स्कॉलरशिप’ उपक्रमामुळे मोठा आधार मिळणार आहे. ‘स्टुडंट हेल्पिंग हँड’ या संस्थेमार्फत या गरजू विद्यार्थ्यांना दोन वेळचे मोफत जेवण पुरविण्यात येत आहे.
या सामाजिक उपक्रमाची सुरुवात फूड स्कॉलरशीपचे संस्थापक कुलदीप आंबेकर यांनी २०१८ मध्ये केली. स्वतः मराठवाडा धाराशिव येथून असलेल्या कुलदीप आंबेकर यांना पुण्यात आल्यानंतर जेवणासाठी अडचणी येत गेल्या तेव्हा त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य कळत गेले आणि त्यावेळी त्यांना फूड स्कॉलरशिप ही कल्पना सुचली. त्यामुळे ग्रामीण भागातून आणि विशेषतः मराठवाडा, विदर्भातून उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दोनवेळच्या जेवणाचा आधार देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट ठरले.
अनेक विद्यार्थी केवळ पैशांअभावी एकवेळ जेवून किंवा उपाशीपोटी अभ्यास करतात. यातून विद्यार्थ्यांमध्ये कुपोषण आणि अशक्तपणा (अॅनिमिया) सारख्या समस्या उद्भवतात, अशा वेळी ही मदत अत्यंत मोलाची ठरत आहे. दरवर्षी 500 विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत आतापर्यंत 3 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या अन्न शिष्यवृत्तीचा लाभ घेतला आहे.
या शिष्यवृत्तीत विद्यार्थ्यांना 2 वेळेला म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी डबा दिला जातो. ही मदत 1 वर्ष केली जाते.
डबा घरपोच न देता केंद्रावरून दिला जातो. एकूण 8 केंद्र असून या केंद्रात स.प. महाविद्यालय, फर्ग्युसन, मराठवाडा मित्र मंडळ, बीएमसीसी, वाडिया आणि हडपसरचा काही भाग यांचा समावेश आहे. एका विद्यार्थ्यावर वर्षभरात 40 हजार इतका खर्च होत असून या उपक्रमासाठी पीएसआर फन्ड, शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, श्री सत्य संघटना आणि मासुम या संस्थेकडून निधी मिळतो या कामासाठी 100 स्वयंसेवक रात्रंदिवस झटत असून 10 ते 15 ऑफिसमध्ये तर 2 ते 3 स्पॉटवर काम करतात. भविष्यात लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचा विचार ‘फूड स्कॉलरशीप’ करत असून दरवर्षी 1 हजार मुलांना लाभ मिळावा असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांना देखील या उपक्रमात आर्थिक किंवा स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येईल.त्यासाठी नागरिकांनी दात्याची भूमिका निभवावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. या सेवेचा लाभ इच्छुकांनी फेसबुक, इन्स्टाग्राम या पेजवर किंवा वेबसाईटवर घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी नवी पेठ, गांजवे चौक येथे संपर्क साधण्याचे आवाहन एस. पी. महाविद्यालयाचा प्रतिनिधी महेश जाधव याने केले आहे.

Previous Post

कचरा द्या… पौष्टिक अन्न घ्या!

Next Post

फेकून दिलेल्या बुटांतून साकारल्या नवीन बॅगा

Admin

Admin

Next Post
फेकून दिलेल्या बुटांतून साकारल्या नवीन बॅगा

फेकून दिलेल्या बुटांतून साकारल्या नवीन बॅगा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.