• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

‘तरंगत्या’ नौकेवर फुलला संसार

Admin by Admin
September 27, 2025
in The Insight
0
‘तरंगत्या’ नौकेवर फुलला संसार

गौतम कुटुुंबियांचा स्वप्नवत प्रवास
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे
एका भारतीय कुटुंबाने नौकेवर राहण्यासाठी कॉर्पोरेट नोकर्‍या आणि पारंपारिक घर सोडून अपारंपरिक जीवनशैली स्वीकारली आहे. भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कॅप्टन गौरव गौतम यांनी त्यांची पत्नी माजी मीडिया व्यावसायिक वैदेही चिटणवीस आणि त्यांची किशोरवयीन मुलगी काया यांच्याबरोबर तरंगत्या नौकेवर संसार थाटला आहे. २०२२ मध्ये ४२ फूट लांबीच्या ‘रीवा’ जहाजावर सुरू झालेला हा प्रवास ते इंस्टाग्राम अकाउंट, द रीवा प्रोजेक्टद्वारे शेअर करत आहेत.
रीवा नावाच्या एका नौकेवर पूर्णवेळ राहण्यासाठी या कुटुंबाने आपली सर्व मालमत्ता विकली आहे. आपली मालमत्ता विकण्यापासून ते कायाला समुद्रात घरी शिकवण्यापर्यंत, त्यांचा प्रवास समाधानकारक आणि आव्हानात्मक दोन्हीही राहिला आहे. त्यांना या नौकेत लागणार्‍या ज्या वस्तू आहेत. त्या ६,००० किलोवरून फक्त १२० किलो केल्या आहेत. विशेषतः त्यांना त्यांचा वारसा असलेले चेकोस्लोव्हाकियन क्रॉकरी सेटपासून वेगळे होण्यास संघर्ष करावा लागला. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा सेट त्यांच्या नवीन घरात टिकणार नाही हे लक्षात येताच त्यांनी तो एका जवळच्या मित्राला भेट दिला.
अखेर स्वप्न साकारले
गौरव यांनी समुद्रात जीवन जगण्याची कल्पना खूप पूर्वीपासून केली होती, परंतु आर्थिक अडचणींमुळे ही कल्पना त्यांना थांबवावी लागली. तथापि, कोविड-१९ महामारीने त्यांच्या स्वप्नाने पुन्हा भरारी घेतली कारण जागतिक स्तरावर बोटीच्या किमती कमी झाल्यामुळे सेलबोट बाळगणे हा अधिक व्यवहार्य पर्याय बनला. त्यांनी १९८८ मध्ये बांधलेली ‘तायाना व्हँकुव्हर ४२ सेलबोट’ रीवा खरेदी केली. प्रथम कुटुंबाला त्यांच्या निर्णयाबद्दल सुरुवातीला शंका होत्या. मात्र ‘आता, २०२५ मध्ये आम्ही हे स्वप्न जगत आहोत असे हे कुटुंब म्हणते.
यात सर्वात मोठा बदल म्हणजे कायाचे शिक्षण. पारंपारिक शाळेत जाण्याऐवजी, तिला घरीच बोटीवर शिकवले जाते. तिचा अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकांपेक्षा जास्त धड्यांनी समृद्ध आहे. ती सागरी जीवनाबद्दल प्रत्यक्ष शिकते, त्यांच्या प्रवासादरम्यान वेगवेगळ्या संस्कृतींचा अनुभव घेते. तिच्यासाठी सुट्ट्या म्हणजे तिचे नौकानयन कौशल्य वाढवणे आणि डेकवरून सूर्यास्त पाहणे हे आहे.
या कुटुंबाला त्यांच्या प्रवासात प्रचंड समाधान मिळत आहे. त्यांच्या या प्रयोगाकडे हजारो लोकांचे लक्ष वेधले आहे, हे त्यांच्या वाढत्या सोशल मीडिया फॉलोअर्सवरून दिसून येते. इंस्टाग्रामवर ८,००० हून अधिक फॉलोअर्स आणि यूट्यूबवर वर देखील असून, ते इतरांना प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत
त्यांच्या अनुभवाविषयी ते म्हणतात की, ‘जहाजावर राहण्याची स्वतःची आव्हाने आहेत. वादळी समुद्रातून प्रवास करण्यापासून ते किमान जीवनशैलीशी जुळवून घेण्यापर्यंत, कुटुंबाला स्वतःचा मार्ग काढावा लागला. ‘गोष्टी कधीच सोप्या नव्हत्या, पण तरीही, हे वीस महिने आश्चर्यकारक होते.

Previous Post

इनफ्लूएन्सरने केली कमाल!

Next Post

सकस, कसदार लेखनशैलीचे साहित्य वाचनीय

Admin

Admin

Next Post
सकस, कसदार लेखनशैलीचे साहित्य वाचनीय

सकस, कसदार लेखनशैलीचे साहित्य वाचनीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.