• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

सकस, कसदार लेखनशैलीचे साहित्य वाचनीय

Admin by Admin
September 29, 2025
in my news pune
1
सकस, कसदार लेखनशैलीचे साहित्य वाचनीय

पराग पोतदार; सुनील शेडगे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
स्वदेस न्युज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
सकस, कसदार व प्रभावी लेखन हे वाचकांच्या मनाचा ठाव घेते. अशा लेखनातून आकाराला आलेले साहित्य हे वाचनीय ठरते, असे मत ‘शब्दसारथी’ परिवाराचे संचालक पराग पोतदार यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सुनील शेडगे यांनी लिहिलेल्या ‘सातार्‍याच्या सहवासात’ या पुस्तकाच्या पाचव्या, तर ‘रेडी ते रेवस’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन पुण्यातील पत्रकार भवनात झाले. कार्यक्रमास परिवर्तन परिवार संस्थेचे समन्वयक समीर जाधवराव, अशोक जाधव, किशोर ढगे, गुलाब देडगे आदी उपस्थित होते.
सुनील शेडगे यांच्याकडे सौंदर्यवृत्ती आहे. त्यांच्या लेखनात मोजकेपणा आहे. लिखाणाला लय आहे. त्यांची अल्पाअक्षरी लेखनशैली लक्षवेधक ठरणारी आहे, असेही पोतदार यांनी नमूद केले. सुनील शेडगे यांचे पुस्तक हे सातार्‍याचे ‘गाईड बुक’ ठरणारे आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जाधवराव यांनी एखाद्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या प्रकाशित होणे, ही वाचकांकडून मिळालेली पोचपावती असल्याचे स्पष्ट केले.
सुधीर धावडे, विठ्ठल ताम्हण, जीवन जाधव, अभिजित घुले- पाटील, किरण भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.
सातारा शिक्षक विचार मंचचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पूनम ढगे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घोरपडे यांनी स्वागत केले. अध्यक्ष कुंडलिक जगदाळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सागर कांबळे, अनिल काटवटे, विनोद शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

‘तरंगत्या’ नौकेवर फुलला संसार

Next Post

पूरग्रस्तांसाठी भाजी विक्रेत्याचे ‘लाख’मोलाची मदत

Admin

Admin

Next Post
पूरग्रस्तांसाठी भाजी विक्रेत्याचे ‘लाख’मोलाची मदत

पूरग्रस्तांसाठी भाजी विक्रेत्याचे 'लाख'मोलाची मदत

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    8 months ago

    वाह….🌱🌱🌱
    सुनील शेडगे सर यांना शुभेच्छा 🌱

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.