• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

इनफ्लूएन्सरने केली कमाल!

Admin by Admin
September 26, 2025
in Inspirational
1
इनफ्लूएन्सरने केली कमाल!

व्हायरल व्हिडओला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे आंध्रप्रदेशहून
सोशल मीडियाचा वापर अनेकजण केवळ टाईमपास म्हणून करतात. परंतु, सोशल मीडियाचा प्रभावी वापर केल्याने चांगले सकारात्मक बदलही होऊ शकतात. याचे आंध्रप्रदेशमधून नुकतेच एक उत्तम उदाहरण समोर आले आहे. एका इनफ्लूएन्सने एका प्राचीन जुन्या मंदिराभोवती पडलेल्या कचर्‍याचा व्हिडीओ पोस्ट करत, या साफसफाईचे आवाहन केले आणि काय आश्चर्य त्याला स्थानिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे ६० लोकांनी एकत्रित येत कचरा साफ करत मंदिर परिसर चकाचक केला.
सोशल मीडियावर फिरणार्‍या एका व्हायरल व्हिडिओमुळे लोकांमध्ये आंध्र प्रदेशातील या प्राचीन मंदिराबद्दल उत्सुकता निर्माण झाली. तसेच, आपला हा पुरातन ठेवा आपणच जपला पाहिजे. त्याचे संवर्धन आणि संरक्षण केले पाहिजे ही भावनाही निर्माण झाली. परिणामी या मंदिराच्या स्वच्छतेसाठी लोक एकवटले.
एका सोशल मीडिया इनफ्लूएन्सरने लोकांना प्राचीन मंदिराच्या विहिरीची स्वच्छता करण्यासाठी त्याच्यासोबत सहभागी होण्याचे आवाहन केले आणि त्याला स्थानिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. एकाचवेळी ६० लोकांनी एकत्र येत विहीरीची स्वच्छता करत मंदिर परिसरातील कचरा साफ केला. सोशल मीडियावरून एका व्यक्तीने घेतलेला पुढाकार आणि त्याला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहता सोशल मीडियाचा वापर योग्यरित्या केला तर ते किती प्रभावी ठरू शकते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, मंदिराच्या रचनेवरून असे दिसून येते की ते भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे संरक्षित केलेले स्थळ असावे. परंतु, मंदिराला सरकारी अनास्थेचा मोठा फटका बसत असल्याचे या व्हिडीओवरून दिसून येत आहे. परंतु, स्थानिकांनी हे काम हाती घेतले आणि मंदिर पुन्हा एकदा समृद्ध बनवले.
या व्हिडीओला युझर्सच्या भरभरून कमेंट मिळत आहे. यामध्ये एकाने म्हटले आहे की, ही एक जनचळवळ बनली पाहिजे. दुसर्‍याने म्हटले आहे की, जास्तीत जास्त लोक अशा कामांमध्ये सहभागी व्हावेत यासाठी हे शेअर करावे आणि त्याचा प्रसार करावा, अशा विविध कमेंटस येत आहेत.
व्हायरल व्हिडिओ आपल्याला सोशल मीडियाची ताकद आणि लोक आपल्या सभोवतालच्या वातावरणात कोणते बदल घडवून आणू शकतात हेच दाखवून देतो.

Previous Post

‘रॅम्पमायसिटी’ मुळे दिव्यांगांचे जीवन बनले सुसह्य

Next Post

‘तरंगत्या’ नौकेवर फुलला संसार

Admin

Admin

Next Post
‘तरंगत्या’ नौकेवर फुलला संसार

‘तरंगत्या’ नौकेवर फुलला संसार

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    8 months ago

    Goood 👍

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.