स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे सिंगापूरहुन
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करत विश्वविजेतेपद मिळवले. विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्विजेतेपद मिळवणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. यावेळी गुकेश आणि त्यांच्या वडिलांमध्ये भावुक क्षण पहायला मिळाला.
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद लढतीत १३ व्या डावापर्यंत दोघांचे ६.५ इतके गुण झाले होते. आज अखेरची १४वी आणि निर्णायक लढत होती. या लढतीत डिंग पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळला. चौदा डावानंतर सर्वप्रथम ज्या खेळाडूचे ७.५ गुण होतील तो विजेता ठरणार होता. या अखेरच्या लढतीत बाजी मारत गुकेशने इतिहास घडवला.
गुकेशच्या आधी २०१३ साली भारताच्या विश्वनाथन आनंदने जागतिक बुद्धिबळ विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर ११ वर्षांनी देशाला हा मान पुन्हा मिळाला आहे. डिंग लिरेन हा या स्पर्धेतील गतविजेता होता. १४व्या लढतीच्या आधी झालेल्या १३ डावांपैकी पहिला डाव ३२ वर्षीय डिंग लिरेनने जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली होती. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्समधील सलग ७ डाव बरोबरीत सुटले होते. अखेर ११व्या डावात विजय मिळून गुकेशने आघाडी घेतली. तेव्हा गुकेशने ६-५ अशी आघाडी मिळवली होती. मात्र डिंगने १२व्या डावात बाजी मारली आणि पुन्हा एकदा बरोबरी झाली. १३वा डाव बरोबरीत सुटल्याने आजचा डाव निर्णयक होता. आज देखील बरोबरी झाली असती तर जलद टायब्रेकरने विजेता ठरवला गेला असता.
चेन्नईचा गुकेश डी हा बुद्धिबळ इतिहासातील तिसरा सर्वात लहान ग्रँडमास्टर आहे. तो २०१९ साली ग्रँडमास्टर झाला होता. बुद्धिबळात २७०० गुणांचे रेटिंग पूर्ण करणारा तो तिसरा सर्वात लहान खेळाडू आहे.
मुंबई जगज्जेतेपद बुद्धिबळ लढतीत गुकेशला क्लासिकल प्रकारात पांढरे मोहरे असताना खेळण्याची अखेरची संधी होती. त्यात त्याने डिंगला चुका करण्यास भाग पाडले. त्याला खेळाची वेळेशी सांगड घालणे अवघड जाईल, ही खबरदारीही घेतली; मात्र त्याच वेळी विजय भक्कम करण्याची संधी मात्र भारतीय आव्हानवीराकडून दवडली गेली. त्यामुळे या लढतीत बुधवारी झालेला तेरावा डाव बरोबरीत सुटला.
सिंगापूरला सुरू असलेल्या या लढतीत गुकेशने सुरुवातीस आगळ्या चाली करून डिंगला गोंधळात टाकले. त्याच्यावरील दडपण वाढत जात होते. त्याला विचार करणे जास्त भाग पडत होते. सुटकेचा मार्ग दिसत नसल्यामुळे तो अस्वस्थ झाला होता; मात्र गुकेशने माफक संधी दिल्यावर डिंगने कौशल्य पणास लावले. जवळपास पाच तास चाललेल्या या लढतीत डावाच्या मध्यास गुकेशचे पारडे चांगलेच वरचढ होते. डिंगसमोर आठ मिनिटांत बारा चाली करण्याचे आव्हान होते. त्यातच त्याची बाजू कमकुवत होती. यातून त्याच्या चुकाही झाल्या; पण गुकेशने त्या वेळी योग्य चाली केल्या नाहीत. त्यामुळे आता लढत अखेरच्या १४व्या डावापर्यंत गेली.
अशी झाली लढत
गुकेशने राजासमोरील प्याद्याने सुरुवात, त्याला डिंगचे फ्रेंच बचावात्मक पद्धतीने उत्तर
– पहिल्या डावात गुकेशने सहाव्या चालीत केलेली अश्वाची खेळी यावेळी पाचव्या चालीच्या वेळी
– गुकेशने ताराश पद्धतीने खेळणे डिंगला अनपेक्षित. डिंगचा सातव्या चालीस १७ आणि आठव्या चालीस ३७ मिनिटे विचार
– गुकेशचा धोकादायक ठरू शकणारा राजाच्या शेजारील उंट अश्वाच्या मोबदल्यात जिंकण्याचा डिंगचा प्रयत्न यशस्वी
– बाराव्या चालीस गुकेशकडून वजिराच्या मदतीने हल्ला अपेक्षित होता; पण हे टाळण्याची चूक गुकेशकडून
– सतराव्या चालीस गुकेशने प्यादे देण्याची तयारी दाखवली. डिंगने हे टाळत आपली बाजू खराब केली
– बाविसाव्या चालीस गुकेशला त्रासदायक ठरणारा अश्व उंटाने मारायचा की अश्वाने हा पर्याय गुकेशसमोर होता. त्या वेळी गुकेशने प्रत्यक्षात दुसरा उंटच गमावला – गुकेश काही प्रभावी चालीनंतर डिंगला स्थिती बरोबरीत आणण्याची संधी देत असल्याचे दिसत होते.
– २७व्या चालीनंतर डाव समान स्थितीत
– २९ आणि ३०व्या चालीस डिंगची चूक. ३१व्या चालीस गुकेश विजयाचा स्पष्ट मार्ग तयार करणार असेच वाटले
– गुकेशने हत्तीची अदलाबदल करून अश्व पुढे आणणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात त्याने गुकेशने अश्वाचीच थेट चाल केली. त्या वेळी अश्वाच्या मोबदल्यात हत्ती जिंकू असेच त्याला वाटले असावे
– गुकेशच्या या चुकीनंतर डिंगने हत्तीची सुरेख चाल केली. त्याच वेळी डाव बरोबरीत सुटणार हे स्पष्ट
– ५५व्या चालीस गुकेशने प्यादे जिंकल्यावरही फारसे काही घडणार नाही, हे स्पष्ट होते.