स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :
आजची चांगली बातमी आहे उत्तर प्रदेशातून
उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यातील माधोपट्टी गाव हे अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात केवळ आयपीएस आणि आयएएस अधिकारीच जन्माला येतात, असे बोलले जाते. जेमतेम 75 घरांची वस्ती असलेल्या गावात तब्बल 47 आयएएस अधिकारी आहेत, जे उत्तर प्रदेशासह देशभरातील विविध राज्यांमध्ये आपली सेवा देत आहेत.
स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या गावातील अनेक नागरीक हे प्रशासकीय सेवेसाठी जायचे. जौनपूर जिल्ह्यापासून हे गाव 11 किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे फक्त प्रशासकीय सेवाच नाही तर या गावातील तरुण चक्क भाभा अॅटोमिक सेंटर, इस्त्रो सारख्या नामांकीत संस्थांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. याशिवाय, इंटरनॅशनल बँकामंध्ये उच्च पदावर कार्यरत आहेत.
दिल्लीसारखी महानगरे सेवा परीक्षांसाठी प्रसिद्ध असताना, माधोपट्टी हे छोटसं गाव दिल्लीला टक्कर देताना दिसतेय. गावातील विद्यार्थ्यांचा अधिकारी होण्याचा प्रवास 1914 मध्ये सुरू झाला. मुस्तफा हुसेन यांच्या रूपाने पहिला आयएएस अधिकारी होण्याचा मान माधोपट्टीला मिळाला. त्यानंतर आजतागायत माधोपट्टी गावाने एकूण 47 अधिकारी देशाला दिले आहेत.
इंदू प्रकाश यांनी 1951 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि IFS पद मिळवलं. त्यांनी ‘द्वितीय’ टॉपर होण्याचा मान मिळवला. 1953 मध्ये तिसरा अधिकारी 1953 मध्ये माधोपट्टी येथील विद्या प्रकाश आणि विनय प्रकाश यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळविलं आणि आयएएस पद स्वीकारलं. 1964 मध्ये अजय आणि छत्रपाल यांनी यूपीएससी मध्ये यश मिळवून गावाचा गौरव केला.
माधोपट्टीच्या यशस्वी उमेदवारांची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या गावात दूरवर एकही कोचिंग सेंटर नाही, तरीही विद्यार्थ्यांच्या निष्ठेने आणि मेहनतीमुळे हे यश मिळते आहे. देशातील सर्वात कठीण परीक्षेत त्यांना स्थान मिळाले आहे. यूपीएससी तयारी आणि त्याच्या प्रवासात कोचिंग हा एक महत्त्वाचा घटक मानला जात असताना, माधोपट्टीने हा विश्वास पूर्णपणे खोटा ठरवलाय. कोचिंगशिवाय, गावात वीज नसतानाही गाव अधिकाऱ्यांनी उजळून निघाले आहे. अधिकार्यांच्या रूपाने हे गाव पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.
माधोपट्टी गावात प्रत्येत सणासुधीला प्रत्येक गल्लीत लाल-निळ्या रंगाच्या दिव्यांच्या गाड्या बघायला मिळतात. या गावाची लोकसंख्या जवळपास 800 इतकी आहे. ज्यामध्ये सर्वाधिक संख्या ही राजपूत समाजाची आहे. इथे शाळांमध्ये माध्यमिक शिक्षण सुरु असतानाच विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनाने शिक्षण दिले जाते.
एकाच कुटुंबात पाच IAS अधिकारी
माधोपट्टी गावात एका कुटुंबाने चांगलाच रेकॉर्ड केला आहे. या कुटुंबातील चार भावंडांनी आयएएसची परीक्षा पास केली आहे. या कुटुंबातील मोठा मुलगा विनय सिंह यांनी 1955 मध्ये यूपीएससीची परीक्षा पास केली होती. विनय सिंह निवृत्तीच्या वेळी बिहारचे मुख्य सचिव होते. त्यांचे भाऊ छत्रपाल सिंह आणि अजयकुमार सिंह 1964 मध्ये IAS बनले होते. त्यानंतर त्यांचे छोटे बंधू शशिकांत सिंह 1968 मध्ये यूपीएससी परीक्षा पास झाले होते. विशेष म्हणजे याच कुटुंबाची पुढची पिढी म्हणजेच शशिकांत सिंह यांचे चिरंजीव यशस्वी हे 2002 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. यशस्वी हे 31 व्या रँकने उत्तीर्ण होत IAS बनले होते.