स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे अमेरिकेतून…
पृथ्वीतलावावरून अवकाश पाहणं आकाशातील चांदण्या मोजणं, चंद्राकडे एकटक पाहत बसणं हे अनेकांचे छंद असतात. काहीजण तर या अवकाशात भ्रमंती करून येण्याची स्वप्ने रंगवतात. असच एक स्वप्न पाहणाऱ्या कार्सन किचनचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. वयाच्या अवघ्या २१ वर्षी कार्सन किचन या मुलीने अंतराळ प्रवास केलाय. २१ वर्षीय ही अमेरिकन विद्यार्थीनी एवढ्या लहान वयात प्रवास करणारी सर्वांत तरुण महिला ठरली आहे.
चॅपल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील वरिष्ठ असलेल्या कार्सेन किचनने NASA-प्रायोजित एरोस्पेस शास्त्रज्ञासह इतर पाच जणांसोबत जेफ बेझोस-स्थापित ब्लू ओरिजिन अंतराळयानातून उड्डाण केले. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिन स्पेसक्राफ्टवर किचनने प्रवास केला. तिच्यासोबत नासा प्रायोजित एरोस्पेस शास्त्रज्ञासह इतर पाच प्रवासी होते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ६२.१४ मैल अंतरावर असलेली आणि बाह्य अवकाशाची सीमा असलेली कार्मन रेषा ओलांडणारी ती सर्वात तरुण महिला ठरली आहे. कार्मन रेषा अनेकदा ‘बाह्य अवकाशाची सुरुवात’ म्हणून ओळखले जाते.
सहा सदस्यांच्या क्रूने हा अंतराळ प्रवास केला. पृथ्वीवर सुरक्षितपणे परत येण्यापूर्वी किचन आणि उर्वरित क्रूने शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव एका मिनिटापेक्षा थोडा जास्त काळ घेतला. त्यांच्या न्यू शेपर्ड प्रोग्रामसह, ब्लू ओरिजिनने आता अधिकृतपणे ४३ लोकांना अवकाशात पाठवले आहे.
अंतराळात प्रवास करणं हे कार्सेनचं स्वप्न होते. कार्सेन किचनने तिचे वडील आणि युएनसीचे प्राध्यापक जिम किचन यांच्या पावलावर पाऊल ठेवून हा इतिहास रचला आहे. पृथ्वीतलावर उतरल्यानंतर तिने तिच्या अनुभवाबद्दल सांगितलं ती म्हणते, “आपला सुंदर ग्रह पाहणे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत याची जाणीव होते.” तिने पृथ्वीला शून्य गुरुत्वाकर्षणातून पाहिले तेव्हा तिचे जीवन बदलल्याचेही तिने सांगितले.
तिचे वडील, जिम किचन हे २०२२ मध्ये न्यू शेपर्ड २० फ्लाइटमध्ये प्रवासी होते. तिने अंतराळात हा ऐतिहासिक क्षण गाठल्यानंतर पृथ्वीवर तिच्या वडिलांनी तिचे मनपूर्वक स्वागत केले. अंतराळ प्रवासातील त्यांच्या आठवणी हे दोघे बापलेक आता कायमस्वरुपी जपणार आहेत.