स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
शहरात स्टार्टअप्स, कन्सल्टंट्स, फ्रीलान्सर्स आणि लघु-मध्यम उद्योगांची संख्या वाढत असताना महत्त्वाच्या व्यावसायिक बैठका घेण्यासाठी योग्य आणि प्रोफेशनल जागा मिळणे ही अनेकांसमोरील समस्या आहे. नेमकी हीच गरज ओळखून पुण्यातील कल्याणी टिळक आणि सुनील गोसावी या बिझनेस पार्टनर्सनी सिंहगड रोड परिसरात ‘7/12 Meeting Café’ ही अनोखी संकल्पना सुरू केली आहे.
नेहमीच्या कॅफेपेक्षा वेगळ्या असलेल्या या ठिकाणी कॉफी आणि गप्पांसोबतच बिझनेस मीटिंग, क्लायंट डिस्कशन, मुलाखती, प्रशिक्षण सत्रे आणि टीम मीटिंगसाठी खास प्रोफेशनल वातावरण उपलब्ध करून देण्यात आले आहे.
अनेक उद्योजकांकडे स्वतंत्र कॉन्फरन्स रूम नसते. त्यामुळे महत्त्वाच्या बैठका कधी गोंगाटाच्या रेस्टॉरंटमध्ये, तर कधी अपुऱ्या ऑफिस स्पेसमध्ये घ्याव्या लागतात. परिणामी क्लायंटसमोरची व्यावसायिक प्रतिमा प्रभावित होण्याची शक्यता असते. या अडचणीवर उपाय म्हणून ‘7/12 Meeting Café’मध्ये दोन ते दहा व्यक्तींसाठी शांत आणि खासगी मीटिंग रूम्स तयार करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक रूममध्ये एलसीडी स्क्रीन, हाय-स्पीड वाय-फाय आणि व्हाईटबोर्ड यांसारख्या सुविधा आहेत. त्यामुळे प्रेझेंटेशन, टीम डिस्कशन किंवा क्लायंटसोबतची चर्चा अधिक प्रभावीपणे करता येते. याशिवाय कंटेंट क्रिएटर्ससाठी स्वतंत्र पॉडकास्ट स्टुडिओची सुविधाही उपलब्ध आहे. ऑडिओ-व्हिडिओ कंटेंटचे रेकॉर्डिंग करण्यासाठीही या जागेचा वापर करता येतो.
या संकल्पनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परवडणारे दर. मोठे ऑफिस किंवा स्वतंत्र कॉन्फरन्स रूम भाड्याने घेण्याऐवजी ही मीटिंग स्पेस अवघ्या ९९ रुपये प्रतितासापासून बुक करता येते. चहा-कॉफी, एक्झिक्युटिव्ह वातावरण आणि पार्किंगची सुविधाही उपलब्ध असल्याने स्टार्टअप्स, फ्रीलान्सर्स, कन्सल्टंट्स आणि एसएमईंसाठी हा पर्याय उपयुक्त ठरत आहे.
“तुमच्या बिझनेसच्या चर्चा आणि कल्पना महत्त्वाच्या असतील, तर त्या ज्या जागेवर होतात, ती जागाही तितकीच प्रोफेशनल असायला हवी,” ही या संकल्पनेमागील भूमिका असल्याचे संस्थापकांचे म्हणणे आहे.
सध्या पुण्यातील उद्योजक, स्टार्टअप्स आणि एसएमईंकडून क्लायंट मीटिंग्स, इंटरव्ह्यू, ट्रेनिंग आणि व्यावसायिक चर्चांसाठी या जागेचा वापर केला जात आहे. भविष्यात या संकल्पनेचा महाराष्ट्रभर विस्तार करण्याचा मानस असल्याचेही सांगण्यात आले.
पत्ता : 7/12 Meeting Café, कल्पवृक्ष, प्रयेजा सिटी रोडजवळ, सिंहगड रोड, वडगाव बुद्रुक, पुणे
संपर्क : +91 7774820300






