• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

जगातील पहिले लहान मुलांचे ढोलताशा पथक पुण्यात सुरू

Admin by Admin
July 24, 2026
in my news pune
0
जगातील पहिले लहान मुलांचे ढोलताशा पथक पुण्यात सुरू

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

पुण्यात ‘शार्पनर’ या संस्थेच्या पुढाकाराने जगातील पहिले लहान मुलांचे अधिकृत ढोल-ताशा पथक सुरू होत आहे. महाराष्ट्राची पारंपरिक संस्कृती आणि ढोल-ताशा वादनाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

मुलांच्या कलागुणांना आणि व्यक्तिमत्त्वाला ‘शार्प’ करणाऱ्या ‘शार्पनर’ संस्थेने या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची पायाभरणी केली आहे.या पथकात प्रामुख्याने शालेय लहान मुला-मुलींचा समावेश असेल, ज्यांना ढोल, ताशा आणि लेझीमचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. शार्पनर या लहान मुलांच्या ढोलपथकाचा सराव प्रामुख्याने पुण्यातील सदाशिव पेठ, राजेंद्र नगर आणि हिंगणे खुर्द (दामोदर नगर) या मध्यवर्ती भागात चालणार आहे. अनेक स्थानिक पथकांचे, विशेषतः नवोदित आणि मुलांच्या पथकांचे मुख्य सराव संकुल येथे आहे.

लहान मुलांची शारीरिक क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी हलक्या वजनाचे ढोल तयार करण्यात आले आहेत. तसेच प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या सुरक्षेची आणि शिस्तीची विशेष काळजी घेतली जाणार आहे. या ढोलपथकात सहभागी होण्यासाठी 30 जुलैपर्यत फॉर्म भरून देण्याची मुदत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी शार्पनर को डॉट इन या बेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ढोलताशात पुण्याच्या ऐतिहासिक ढोल-ताशा संस्कृतीमध्ये आता ही लहान मुले आपल्या वादनाने एक नवा अध्याय जोडणार आहेत. ज्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात बालगोपाळांचा हा अनोखा उत्साह पुणेकरांना अनुभवता येईल

Previous Post

भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताची सुवर्णभरारी

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.