• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

सोलर जीवना’ मुळे ग्रामीण जीवन झाले सुखमय

Admin by Admin
August 4, 2025
in Inspirational
0
सोलर जीवना’ मुळे ग्रामीण जीवन झाले सुखमय

१७ वर्षीय अयान चोप्राने शोधला सोलर चक्कीचा भन्नाट पर्याय

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे गुरुग्रामहून
ग्रामीण भागात आजही वीजेच्या समस्या आहेत. वीज नसेल तर दैनंदिन जीवनातीलही अनेक कामे ठप्प होतात. त्याला पर्याय म्हणून अनेक ठिकाणी काही कामांसाठी यंत्र चालविण्यासाठी डिझेलचा वापर करतात. परंतु, हा पर्यायही खर्चिक आणि अनेकदा प्रदूषण निर्माण करणारा ठरतो. त्यामुळेच हरियाणातील गुरूग्राम येथील एका सतरा वर्षीय युवक अयान चोप्रा याने भन्नाट पर्याय शोधून काढला आहे. गावांमधील डिझेलवर चालणार्‍या चक्क्या आता सौरउर्जेवर चालत आहे, ज्यामुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. ‘प्रोजेक्ट सूर्य चक्रा’ या त्याच्या उपक्रमातून आतापर्यंत १५ गावांमध्ये सोलर चक्की लावल्या गेल्या असून हजारो लिटर डिझेल वाचवण्यात यश आलं आहे.
गावामध्ये चक्की चालवण्यासाठी पूर्वी डिझेलचा वापर केला जात. मात्र, त्यामुळे होणार्‍या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असे, ज्याचा परिणाम विशेषत; लहान मुले आणि वृद्धाच्या आरोग्यावर होत होता. तसेच, परिसरातील वातावरणही बिघडत होते. त्यामुळेच आयान याने डिझेलला सौरउर्जेचा भन्नाट पर्याय शोधून काढला. ‘प्रोजेक्ट सूर्य चक्रा’ हा उपक्रमाच्या माध्यमातून सोलर चक्कीचा पर्याय समोर आणला. याचे महत्त्व लोकांना समजावून सांगण्यासाठी त्याने गावागावात जाऊन चक्कीधारकांशी संवाद साधला आणि त्यांना सोलर चक्कीचे फायदे सांगितले. आता, प्रत्येक सोलर चक्की दरवर्षी सुमारे १४,४०० युनिट्स स्वच्छ ऊर्जा निर्माण करते आणि हे सर्व विनाआवाज आणि कोणत्याही खर्चाशिवाय. विशेष म्हणजे त्याच्या या उपक्रमातून महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. १५ पैकी ८ चक्की महिला चालवतात आणि त्या आता त्यांच्या गावातल्या इतर महिलांनाही प्रोत्साहित करत आहेत.
याबाबत गावातील एका महिलेने सांगितलं की, आधी तिची मुलं रस्त्यावरील दिव्याखाली अभ्यास करत होती, पण आता घरात शांतता आहे आणि उत्पन्नही वाढलं आहे. या उपक्रमामुळे आतापर्यंत १३ हजार लिटर डिझेलची बचत झाली आहे आणि सुमारे ३५ हजार किलो कार्बन उत्सर्जन टळले आहे. अयान सध्या ग्रामीण भागासाठी सोलर पॅनेल देखभाल व्हिडिओ, सस्टेनेबल शिक्षण पाठ्यक्रम आणि डोळ्यांचं संरक्षण करणार्‍या गॉगल्ससाठी निधी गोळा करत आहे.
याविषयी वाराणसी येथील आटा चक्की कामगार संतोष कुमार म्हणतात, पूर्वी, आमच्याकडे १४ तास काम असायचे. आम्हाला आमच्या ट्रॅक्टरच्या मोटरने आटा चक्की (पारंपारिक पिठाची गिरणी) चालवावी लागायची, जी आम्ही शेतात काम केल्यानंतर संध्याकाळी वापरायचो. आता, सौरऊर्जेमुळे, आम्ही अर्ध्या वेळेत काम पूर्ण करतो. आमचे महिन्याला सुमारे २५ हजार रुपये वाचतात कारण आम्हाला आता डिझेल खरेदी करावे लागत नाही. आम्ही भरलेला ईएमआय त्यापेक्षाही कमी आहे आणि जेव्हा तो उपक्रम पूर्ण होईल तेव्हा आम्हाला मोफत वीज मिळेल,
१०० सोलर चक्की सुरु करण्याचे उद्दीष्ट
ही केवळ सुरुवात आहे. पुढील पाच वर्षांत १०० सोलर चक्की सुरू करणे हे आमचे उद्दीष्ट आहे. यामुळे लाखो लिटर डिझेलची बचत होत आहे. ऊर्जा बदल हा केवळ पर्यावरणासाठी नाही, तर ग्रामीण जीवनात सन्मान, सुलभता आणि अभिमान परत देण्यासाठी असल्याचे अयान चोप्रा सांगतो.

Previous Post

सादागड हेट्टी झाले ‘स्वयंप्रकाशित’

Next Post

पारंपरिक खेळातून जपली जातेय संस्कृती

Admin

Admin

Next Post
पारंपरिक खेळातून जपली जातेय संस्कृती

पारंपरिक खेळातून जपली जातेय संस्कृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.