• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पारंपरिक खेळातून जपली जातेय संस्कृती

Admin by Admin
August 6, 2025
in Success Story
1
पारंपरिक खेळातून जपली जातेय संस्कृती

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे बंगळूरहून :-

सध्याच्या डिजिटल युगात आपले भारतीय पांरपरिक खेळ मुले विसरत चालली आहे. काही खेळ तर काळाच्या ओघात लुप्त झाले आहे की, काय असेच वाटत आहे. त्यामुळेच आपले हे खेळ जतन व्हावेत आणि पुढील पिढीपर्यंत पोहचावेत यासाठी कर्नाटकातील बंगळूरमधील तनुश्री एस.एन. आणि शशिशेखर एस. या दाम्पंत्याने ‘रोल द डाईस’ या नावाने कंपनी स्थापन करून आपले भारतीय पारंपरिक खेळ याद्वारे पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे. पगडे, चौकाबारा, गंजिफा यासारखे खेळ बनवत असून, त्याला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

तनुश्री एस.एन. आणि शशिशेखर एस. अखिल या आयटी इंजिनिअर असलेल्या दाम्पंत्याने पारंपरिक खेळाच्या माध्यमातून आपली संस्कृती जतन करण्याच्या केलेल्या या प्रयत्नाचे सर्वत्र मोठे कौतुक होत आहे.
२०१३ साली आई झाल्यानंतर तनुश्रीच्या लक्षात आले की, आजच्या मुलांमध्ये भारतीय पारंपरिक खेळांची ओढ संपत चालली आहे. सध्या मुले मोबाईल गेम्स, टी.व्ही, व्हिडीओ गेम्स अशा गोष्टींमध्ये अडकले आहेत. परंतु आपल्या संस्कृतीतील पारंपरिक खेळ मात्र लुप्त होत आहेत. जे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विकास करणारे आहेत. त्यामुळेच आपले हे खेळ जतन होणे गरजेचे आहे. हाच विचार करून तिने स्वतःच हाताने खेळ बनवायला सुरुवात केली. यामध्ये पगडे, चौकाबारा, गंजिफा यासारख्या खेळांचा समावेश आहे. हे खेळ तिने आई आणि मैत्रिणीच्या मदतीने तिने फॅब्रिक आणि दोर्‍यांनी शिवायला सुरुवात केली.
सुरुवातीला फक्त घरातल्या मुलांसाठी हे खेळ बनवले जात होते, पण हळूहळू लोकांना ते आवडू लागले आणि ऑर्डर्स येऊ लागल्या. इथेच तनुश्री आणि शशिशेखरनं यांनी गलेलठ्ठ पगाराची आयटीमधील नोकरी सोडून पूर्णवेळ याच कामाला वाहून घेण्याचे ठरवले आणि त्यांनी ‘रोल द डाईस’ नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीद्वारे त्यांनी केवळ जुन्या खेळांचं पुनरुज्जीवन केलं नाही, तर प्रत्येक खेळाची गोष्ट, इतिहास, नियम शोधून काढले. मंदिरे, गावातील वडीलधारी मंडळी यांच्याकडून माहिती गोळा केली. कार्डबोर्डवरून ते टिन बॉक्स, लाकडी प्यादे, शंख-शिंपले वापरून त्यांनी खेळ अधिक आकर्षक आणि टिकाऊ बनवले. प्रत्येक खेळ हाताने बनवलेला, पर्यावरणपूरक आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारा. आज त्यांच्या कलेक्शनमध्ये १७ हून अधिक पारंपरिक खेळ आहेत. त्यामध्ये पगडे, चौकाबारा, गंजिफा, रमाायण पझल, पतंग बनवण्याचे गेम, मोदक रेस अशा विविध खेळांचा समावेश आहे.
२०१९ मध्ये त्यांनी ऑनलाइन स्टोअर सुरू केलं आणि नंतर अ‍ॅमेझॉनवर देखील प्रॉडक्ट्स लिस्ट केले. २०२२ मध्ये मैसूरमध्ये अनुभव केंद्र सुरू केलं, जिथे लोक येऊन खेळ खेळू शकतात. त्यांनी बनवलेले खेळ बेंगळुरू, पुणे आदी ठिकाणी खेळांच्या दुकानात उपलब्ध आहेत. यातून साधारणत: महिन्याला दोन लाखांचे उत्पन्न त्यांना मिळते आहे. आज हजारो मुले आणि पालक त्यांनी बनवलेले पारंपारिक खेळ शिकत आहेत. हा उपक्रम केवळ व्यवसाय नाही तर आपली भारतीय संस्कृती जपण्याचे मोठे काम असल्याचेही दोघे सांगतात. त्यांच्या या कामाची दखल घेऊन २०२३ साली त्यांना ‘स्टार्टअप कर्नाटका इलेव्हेट’ या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. उपक्रमाचे

‘रोल द डाईस’ ही भारतीय पारंपरिक खेळांची कंपनी आहे, त्यांचे अध्यक्ष किंवा संस्थापक नाहीत. या पारंपारिक खेळांमुळे स्मरणशक्ती वाढते. त्याचबरोबर पारंपारिक खेळांचा इतिहास आणि संस्कृती यांचा मेळ घालतात.

 

 

Previous Post

सोलर जीवना’ मुळे ग्रामीण जीवन झाले सुखमय

Next Post

‘उदयगिरी’ ने भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढले

Admin

Admin

Next Post
‘उदयगिरी’ ने भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढले

'उदयगिरी' ने भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढले

Comments 1

  1. Kishor Prakash Dhage says:
    10 months ago

    🙏👍

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.