• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

सिक्कीम ठरले जगातील पहिले सेंद्रिय राज्य

Admin by Admin
August 21, 2025
in Success Story
0
सिक्कीम ठरले जगातील पहिले सेंद्रिय राज्य

पर्यावरणपुरक बांबूची बाटली देणारे राज्य म्हणूनही गौरव
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे सिक्कीमहून
सिक्कीम जगातील पहिले पूर्णपणे सेंद्रिय राज्य ठरले असून, प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी बांबूच्या बाटल्या पर्यटकांना देणारे अशी ओळखही सिक्कीमने निर्माण केली आहे. यामुळे पर्यावरणाबाबत जागरूक जीवनशैलीचे जागतिक उदाहरण सिक्कीमने प्रस्थापित केले.
भारताच्या ईशान्येकडील राज्य असलेले सिक्कीम हे जगातील पहिले पूर्णपणे सेंद्रिय राज्य ठरले आहे. येथे शंभर टक्के सेंद्रिय शेती केली जाते. ज्यामध्ये कोणतेही रासायनिक खते किंवा कीटकनाशके वापरली जात नाहीत. हे परिवर्तनकारी पाऊल केवळ सिक्कीमच्या नाजूक हिमालयीन परिसंस्थेचे रक्षण करत नाही तर उर्वरित जगासाठी शाश्वत विकासाचे एक उत्तम उदाहरण म्हणून देखील काम करते आहे.
डोंगराळ भागात शेतीमध्ये क्रांती बदल केलेले हे राज्य आहे. प्लास्टिकच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांवर बंदी घालणारे सिक्कीम हे पहिले शहर आहे. प्लास्टिक बाटल्यांना पर्याय म्हणून बांबूच्या बाटल्या बाजारपेठेत उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नैसर्गिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य बाटल्या आता हॉटेल्स, होमस्टे आणि पर्यटन स्थळांमध्ये वापरल्या जातात.
प्लास्टिकचे प्रदूषण कमी करणे आणि स्थानिक कारागिरांना पाठिंबा देत ग्रामीण रोजगार निर्माण करणे हा ही प्रमुख उद्देश आहे. हा एक छोटासा बदल आहे ज्याचा मोठा परिणाम होईल, विशेषतः अशा राज्यात जिथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात.
सिक्कीमचा सेंद्रिय राज्याचा प्रवास सन २००३ मध्ये सुरू झाला. जेव्हा राज्य सरकारने रसायनमुक्त शेतीसाठी एक धाडसी पाऊल उचलले. पुढील काही वर्षांत अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले, कंपोस्टिंगला प्रोत्साहन दिले आणि कृत्रिम निविष्ठांवर बंदी घातली. परिणामी २०२० पर्यंत सर्व ७६,००० हेक्टर लागवडीखालील जमीन अधिकृतपणे सेंद्रिय प्रमाणित करण्यात आली. यामुळे मातीचे आरोग्य सुधारले आणि पिकांची गुणवत्ता वाढवली. यामुळे शेतकर्‍यांना पारंपारिक आणि पर्यावरणपूरक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले गेले, ज्यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिक दोन्ही फायदे झाले. या उपक्रमामुळे राज्याच्या इको-टुरिझम आणि देशभरात सेंद्रिय उत्पादनांनां मोठी मागणी वाढली.
सिक्कीमची पर्यावरणाविषयी जागरूक धोरणे शेतीपलीकडेही विस्तारलेली आहेत. राज्याने प्लास्टिक पिशव्यांवर देखील बंदी घातली आहे, अक्षय ऊर्जेला प्रोत्साहन दिले आहे. या त्यांच्या कामगिरीची जागतिक पर्यावरणवादी आणि धोरणकर्त्यांकडून प्रशंसा झाली आहे. पर्यावरण संवर्धनासह संतुलित विकास साधता येतो हे ही यामुळे अधोरेखित झाले आहे.

Previous Post

आठ हजार वृक्षांची माता ; सालुमारदा थिम्माक्का

Next Post

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लागली परकीय भाषेची ओढ

Admin

Admin

Next Post
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लागली परकीय भाषेची ओढ

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लागली परकीय भाषेची ओढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.