• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

आठ हजार वृक्षांची माता ; सालुमारदा थिम्माक्का

Admin by Admin
August 20, 2025
in Inspirational
0
आठ हजार वृक्षांची माता ; सालुमारदा थिम्माक्का

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे कर्नाटकहून
जागतिक ग्लोबल वॉर्मिंगचा फटका आज सगळ्या जगाला बसत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. मात्र, कर्नाटकातील सालुमारदा थिम्माक्का या महिलेने आतापर्यंत ८ हजार वृक्षांची लागवड करून त्याचे आपल्या मुलांप्रमाणे संगोपन केले. त्यामुळेच सालुमारदा थिम्माक्का यांना ‘मदर ऑफ ट्री’ तथा वृक्षांची आई म्हणून ओळखले जाते. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
सालुमारदा थिम्माक्का या कर्नाटक राज्यातील रमनगारा जिल्ह्यातील आहेत. त्यांचा जन्म १९१०-१९१२ या दरम्यान झाला आहे. त्यानुसार त्या आता ११४ वर्षांच्या आहेत. त्यांनी लावलेली छोटेशी रोपटे आज डेरेदार वृक्ष झाले असून, त्याच्या विशाल छायेत वाटसरू, प्रवासी एक वेगळ्या सुखाची अनुभूती घेत आहेत, त्याची फळे चाखत आहेत.
थिम्माक्का यांचे बिक्कलू चिक्कया यांच्यासी लग्न झाल्यानंतर थिमाक्का हुलिकल येथे राहायला आल्या. दिवसभर काम करुन मिळावलेल्या पैशात पोट भरायचं अशा परिस्थितीमध्ये हे दोघे गावामध्येच पडेल ते काम करु लागले. लग्नाला अनेक वर्षे उलटली तरी या दोघांना मूल होईना, त्यामुळे गावामध्ये या विषयावरुन चर्चा होऊ लागली आणि या दोघांना त्याचा त्रास होऊ लागला. या गोष्टीकडून लक्ष विचलित करण्यासाठी दोघेही काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात होते. त्याच वेळी हुलिकल गावाच्या जवळ रस्ता बांधण्यास सुरुवात झाली. या रस्त्याच्या बाजूने झाडं लावण्याची कल्पना थिमाक्कांच्या मनात आली. त्यानुसार थिमाक्का रोज एक वडाचं झाड या रस्त्याच्या बाजूला लावू लागल्या. या कामामध्ये त्यांना पती बिक्कलूही मदत करायचे. या दोघांनी गावकर्‍यांकडून होणार्‍या चर्चेकडे दूर्लक्ष करण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या या वडाच्या झाडांची संख्याही साडेतीनशेहून अधिक झाली. दोघेही मिळून या झाडांना पाणी घालायचे, या झाडांची ते आपल्या मुलांप्रमाणे काळजी घ्यायचे.
आज हुलिकल गाव येण्याआधीपासूनच चार किलोमीटरवरुन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वटवृक्षांची रांगच दिसते. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वडाची झाडं असलेला हा सुमारे चार किलोमीटरचा पट्टा म्हणजे थिमाक्का आणि बिक्कलू यांनी काही दशकांपूर्वी दुतर्फा लावलेली वडाची रोपटी, जी आता वटवृक्ष झाली आहेत. थिमक्का नावाने काम सुरु करणार्‍या या आजीबाईंना आता ‘सालुमारदा थिमाक्का’ असं नाव मिळालं आहे. ‘सालुमारदा’ या कानडी शब्दाचा अर्थ होतो एका रांगेत लावलेली झाडं. १९९१ साली बिक्कलू यांचे निधन झाल्यानंतरही थिमाक्कांनी आपले काम सुरु ठेवले आहे.
सरकारही नमले
सालुमारदा थिम्माक्का यांनी आतापर्यत ८००० वृक्षांची लागवड केली आहे. थिम्माक्का यांनी लावलेली झाडे आता ७० वर्षांची झाली आहेत. इतकचं नाही तर ज्या हायवेवर त्यांनी वृक्षारोपण केले होते. त्या हायवेचे रुंदीकरण करण्यात येणार होते. या रुंदीकरणात त्यांनी लावलेली सर्व झाडे मोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, या विरोधात थिम्माक्का यांनी आवाज उठवत हा निर्णय सरकारला मागे घ्यायला लावला. थिम्माक्का यांनी वर्षोनुवर्ष या झाडांची आपल्या मुलांप्रमाणे देखभाल केली. सर्व झाडांना एका आईप्रमाणे त्यांनी माया दिली. त्यामुळे त्यांना मदर ऑफ ट्री असे म्हटले जाते.
सालुमारदा थिम्माक्का यांना २०१९ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना वयाच्या १०७ व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आला. तसेच त्यांना हा पुरस्कार झाडांना आईप्रमाणे प्रेम दिल्याबद्दल प्रदान करण्यात आला. थिम्माक्का यांना सर्वात वृद्ध पर्यावरण कार्यकर्ती मानले जाते. २०२० साली सालुमारदा यांना कर्नाटक सेंट्रल युनिवर्सिटीतर्फे डॉक्टरेट ही पदवी देण्यात आली.

Previous Post

ईस्त्राईलमध्येही अभिमानाने बोलतात मराठी

Next Post

सिक्कीम ठरले जगातील पहिले सेंद्रिय राज्य

Admin

Admin

Next Post
सिक्कीम ठरले जगातील पहिले सेंद्रिय राज्य

सिक्कीम ठरले जगातील पहिले सेंद्रिय राज्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.