• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लागली परकीय भाषेची ओढ

Admin by Admin
August 22, 2025
in Inspirational
0
दृष्टिहीन विद्यार्थ्यांना लागली परकीय भाषेची ओढ

जर्मन भाषेच्या अभ्यासक्रमाला नऊ विद्यार्थ्यांचा प्रवेश
स्वदेस न्यूज(प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
अस म्हणतात की नवं काहीतरी शिकण्याची ओढ अनेक अडचणींवर मात करत असते. अशीच ओढ लागली आहे दृष्टिहीन विद्यार्थ्यांना!त्यांनीदेखील काळाप्रमाणे बदलत नवी ‘डोळस’ वाट धुडाळली आहे. दृष्टी नसली तरी स्वप्नांच्या आकाशाला गवसणी घालण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. यातूनच स्पर्शातून अक्षरे… श्रवणातून उच्चार आणि मनातून अर्थ ओळखत तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी जर्मन ही परदेशी भाषा शिकण्याच्या नव्या वाटेवर पाऊल टाकले आहे.
या विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन, परकीय भाषेच्या अनोख्या प्रवासास ‘डोळस’ सुरवात केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेचा आठ महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्यात येतो. यंदा या अभ्यासक्रमास नऊ दृष्टिहीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या विद्यार्थ्यांनाही जर्मन भाषा शिकता यावी, यासाठी जर्मन भाषा विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअंतर्गतच या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला आहे. एकांश ट्रस्टच्या अनिता अय्यर यांच्यामार्फत या नऊ विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे शुल्क भरण्यात आले आहे. आठवड्यातून तीन दिवस चालणार्‍या या अभ्यासक्रमात एकूण ५० विद्यार्थी असून, त्यात नऊ विद्यार्थी हे दृष्टिहीन आहेत.’
याविषयी विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागातील जर्मन भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. स्वाती आचार्य म्हणाल्या, ‘दृष्टिहीन विद्यार्थ्यांना विशिष्ट शिक्षण प्रणालीद्वारे जर्मन भाषेचे ज्ञान दिले जात आहे. यात ध्वनीच्या साहाय्याने भाषा शिकविणे, त्यानंतर ब्रेलसह अन्य माध्यमातून भाषेची ओळख, संवाद साधण्याचे कौशल्य शिकविण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
‘जर्मन भाषा आली, की जर्मन कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यातून चांगल्या प्रकारे करिअर करणे शक्य आहे, हे या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणूनच परकीय भाषा शिकण्याचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे,’ असेही आचार्य यांनी सांगितले.
याविषयी बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात (बीएमसीसी) बी. कॉमच्या द्वितीय वर्षात शिकत असणारा मारुती कांबळे म्हणतो, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परकीय भाषा विभागात जर्मन भाषेच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. याबद्दल मित्रांकडून माहिती मिळाली होती. जर्मन भाषा शिकल्यानंतर भाषांतर, बँकिंग अशा विविध क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. म्हणून हे शिक्षण घेणे महत्त्वाचे वाटले.’
बीएमसीसीमध्ये बी. कॉमच्या द्वितीय वर्षाला असणारी गीतांजली ढोबे म्हणते, ‘लहानपणापासूनच परदेशी भाषा शिकावी, असे स्वप्नं होते. म्हणूनच बी. कॉमच्या प्रथम वर्षाला मी जर्मन भाषा विषय घेतला होता. त्यानंतर या भाषेत आणखी अभ्यास करायची इच्छा होती, म्हणून प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. यापुढे जर्मन भाषेतील विविध परीक्षा देऊन ही भाषा अवगत करण्याचा मानस आहे.’

Previous Post

सिक्कीम ठरले जगातील पहिले सेंद्रिय राज्य

Next Post

दादर चौपटी झाली चकाचक

Admin

Admin

Next Post
दादर चौपटी झाली चकाचक

दादर चौपटी झाली चकाचक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.