• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

१२ वर्षांच्या केशवची ज्ञानदानाची चळवळ

‘पेकाबुक’मधून हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पुस्तके

Admin by Admin
June 12, 2026
in Inspirational
0
१२ वर्षांच्या केशवची ज्ञानदानाची चळवळ
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी नवी दिल्लीहून…

एका मुलाकडे अभ्यासासाठी भरपूर पुस्तके असतात, तर दुसऱ्या मुलाला त्याच पुस्तकांची गरज असते… या विरोधाभासाने नवी दिल्लीतील केशव गर्ग हा अवघा १२ वर्षांचा विद्यार्थी अस्वस्थ झाला. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत आणि घरात न वापरता पडून असलेल्या पुस्तकांचा योग्य उपयोग व्हावा, या विचारातून त्याने सुरू केलेला छोटासा प्रयत्न आज ‘पेकाबुक’ या प्रेरणादायी चळवळीत रूपांतरित झाला आहे.

केशवने या उपक्रमाची सुरुवात आपल्या घरापासून केली. घरातील नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांकडे असलेली वापरात नसलेली जुनी पुस्तके त्याने गोळा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला हा एक छोटासा प्रयत्न होता; मात्र त्यामागील हेतू पाहून अनेक जण या उपक्रमाशी जोडले गेले. हळूहळू या प्रयत्नाने मोठ्या चळवळीचे रूप घेतले.

‘पेकाबुक’च्या माध्यमातून पुस्तके गोळा करणे, त्यांचे वर्गीकरण करणे आणि ती योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नियोजनबद्ध व्यवस्था उभी करण्यात आली. आजपर्यंत या उपक्रमातून १५ हजारांहून अधिक पुस्तके गरजू विद्यार्थी, सरकारी शाळा, ग्रंथालये आणि स्वयंसेवी संस्थांपर्यंत पोहोचली आहेत.

या चळवळीचा उद्देश केवळ पुस्तके वाटणे एवढाच नाही, तर ज्ञानाचे समान वाटप करणे, वाचनाची आवड निर्माण करणे आणि आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात अडथळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे हा आहे. वापरात नसलेल्या पुस्तकांचा पुनर्वापर करून पर्यावरण संवर्धनालाही या उपक्रमातून हातभार लागत आहे.

केशव सांगतो, “एखाद्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पुस्तक मिळाल्यानंतर दिसणारा आनंद आणि त्याच्या डोळ्यांतील आशा हीच माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे.”

केशवच्या या उपक्रमाने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. समाजात बदल घडवण्यासाठी मोठे पद किंवा मोठे वय आवश्यक नसते; गरज असते ती संवेदनशील विचारांची आणि काहीतरी चांगले करण्याच्या इच्छाशक्तीची.
ज्ञानाची ज्योत पुढे नेणारी ‘पेकाबुक’ ही चळवळ आज अनेक विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आशेचा किरण ठरत आहे.

Previous Post

अपंगत्व येऊनही ध्यास पर्यावरण रक्षणाचा

Next Post

बालविवाहाच्या उंबरठ्यावरून शिक्षणाच्या वाटेवर…

Admin

Admin

Next Post
बालविवाहाच्या उंबरठ्यावरून शिक्षणाच्या वाटेवर…

बालविवाहाच्या उंबरठ्यावरून शिक्षणाच्या वाटेवर…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.