- ऑलिम्पिकमधील कामगिरी मागे टाकत डायमंड लीगमध्ये नीरजने गाजवले पुन्हा मैदान
- १४ दिवसांत थ्रो ठरला बेस्ट
स्वदेस न्यूज:- (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून…
भारताचा गोल्डन बाॅय नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या कामगिरीनंतर तो लुसाने डायमंड लीग 2024 या स्पर्धेत सहभागी झाला. या स्पर्धेतही नीरजने उल्लेखनीय कामगिरी केली. ल्युसान डायमंड लीगमध्ये त्याने शेवटच्या प्रयत्नात चमत्कार करून 89.49 मीटर भालाफेक केली आणि येथे दुसरा क्रमांक पटकावला. ही त्याची या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी ठरली.
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी हर्नियाने त्रस्त असलेला नीरज चोप्रा 4 प्रयत्नांपर्यंत चौथ्या क्रमांकावर होता, त्याने भाला फेकल्यावर सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. जेव्हा त्याने भाला फेकला तेव्हा त्याचा भाला 89.49 मीटर अंतरावर पडला. यानंतर चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेताच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले.
नीरज चोप्रा पुढील दोन महिने खेळापासून दूर राहणार आहे. नीरज चोप्रा पुढील दोन महिने खेळापासून दूर राहणार आहे. त्याच्यावर शस्त्रक्रियाही होण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे तो सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही, असे त्याने पॅरिस ऑलिम्पिकदरम्यान सांगितले होते.