• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

मीराबाई चानुने केली सुवर्णपदाची हॅट्ट्रीक!

राष्ट्रकुल स्पर्धेत उल्लेखनीय यश, तिरंग्याचा सन्मान

Admin by Admin
July 27, 2026
in Success Story
0
मीराबाई चानुने केली सुवर्णपदाची हॅट्ट्रीक!

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे ग्लासगो येथून

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानु हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ४८ किलो वजनी गटात ऐतिहासिक सुवर्णपदक पटकावले. तिने एकूण १९० किलो वजन उचलून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकांची हॅट्रिक केली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकणारी ती पहिली भारतीय वेटलिफ्टर ठरली असून हे २०२६ च्या स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक आहे.
मीराबाई चानु यांनी ‘स्नॅच’मध्ये विक्रमी ८५ किलो तर ‘क्लिन अँड जर्क’मध्ये १०५ किलो वजन उंचावत तिने विश्वास सार्थ ठरविला. मीराबाईची कामगिरी एवढी जबरदस्त होती की, तिच्या आणि रौप्यपदक विजेत्या नायजेरियाच्या रुथ असुको एनयाँगच्या कामगिरीत २२ किलोंचा फरक होता. ‘स्नॅच’ आणि ‘क्लीन अँड जर्क’ या दोन्ही शैलींतील पहिल्या प्रयत्नांत तिच्याकडून गडबड झाली होती. मात्र आत्मविश्वासाने परिपूर्ण मीराबाईने दणक्यात पुनरागमन करत खणखणीत कामगिरी करून दाखवली.
टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईने २०१४ मध्ये ग्लासगो येथेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आपल्या आंतरराष्ट्रीय यशाची सुरुवात केली होती. त्याच भूमीत पुन्हा एकदा ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून तिने भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे.
याआधी बिहारच्या झंडू कुमार याने पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचं खातं उघडलं होतं. त्यानंतर ऋषिकांत सिंगने पुरुषांच्या ६० किलो गटात रौप्यपदक मिळविले. मीराबाईच्या सुवर्णानंतर आता भारताकडे १ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ३ पदकं झाली आहेत.

Previous Post

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर ‘ती’ तैनात

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.