पराग पोतदार; सुनील शेडगे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन
स्वदेस न्युज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
सकस, कसदार व प्रभावी लेखन हे वाचकांच्या मनाचा ठाव घेते. अशा लेखनातून आकाराला आलेले साहित्य हे वाचनीय ठरते, असे मत ‘शब्दसारथी’ परिवाराचे संचालक पराग पोतदार यांनी व्यक्त केले.
जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून सुनील शेडगे यांनी लिहिलेल्या ‘सातार्याच्या सहवासात’ या पुस्तकाच्या पाचव्या, तर ‘रेडी ते रेवस’ या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन पुण्यातील पत्रकार भवनात झाले. कार्यक्रमास परिवर्तन परिवार संस्थेचे समन्वयक समीर जाधवराव, अशोक जाधव, किशोर ढगे, गुलाब देडगे आदी उपस्थित होते.
सुनील शेडगे यांच्याकडे सौंदर्यवृत्ती आहे. त्यांच्या लेखनात मोजकेपणा आहे. लिखाणाला लय आहे. त्यांची अल्पाअक्षरी लेखनशैली लक्षवेधक ठरणारी आहे, असेही पोतदार यांनी नमूद केले. सुनील शेडगे यांचे पुस्तक हे सातार्याचे ‘गाईड बुक’ ठरणारे आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जाधवराव यांनी एखाद्या पुस्तकाच्या पाच आवृत्त्या प्रकाशित होणे, ही वाचकांकडून मिळालेली पोचपावती असल्याचे स्पष्ट केले.
सुधीर धावडे, विठ्ठल ताम्हण, जीवन जाधव, अभिजित घुले- पाटील, किरण भुजबळ आदी यावेळी उपस्थित होते.
सातारा शिक्षक विचार मंचचे कार्याध्यक्ष गणेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. पूनम ढगे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घोरपडे यांनी स्वागत केले. अध्यक्ष कुंडलिक जगदाळे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी सागर कांबळे, अनिल काटवटे, विनोद शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.







वाह….🌱🌱🌱
सुनील शेडगे सर यांना शुभेच्छा 🌱