• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

गिधाडांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांचा अनोखा त्याग

लग्न असो वा सण, या गावात डीजे वाजत नाही!

Admin by Admin
October 14, 2026
in Inspirational
0
गिधाडांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांचा अनोखा त्याग
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे रायगडहून

लग्नसमारंभ असो वा सण-उत्सव, मोठ्या आवाजात डीजे वाजवणे आणि फटाक्यांची आतषबाजी करणे म्हणजे आनंद साजरा करण्याची जणू प्रथाच बनली आहे. मात्र, महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील चिरगाव या गावाने याला अपवाद ठरत निसर्गसंवर्धनाचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या गिधाडांचे अस्तित्व टिकवण्यासाठी गावकऱ्यांनी डीजे, लाऊडस्पीकर आणि फटाक्यांवर निर्बंध घातले. झाडांचे संरक्षण, खाद्याची व्यवस्था आणि सामूहिक प्रयत्नांच्या बळावर गिधाडांची संख्या २२ वरून ३४७ पर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश आले.

ऑक्टोबर २००० मध्ये निसर्गसंवर्धक प्रेमसागर मेस्त्री नियमित क्षेत्रभेटीसाठी चिरगाव परिसरात आले होते. म्हसळ्याजवळ एका मृत प्राण्याभोवती त्यांना सुमारे १३ गिधाडे दिसली. त्यांचा मागोवा घेत ते चिरगावपर्यंत पोहोचले. गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर परिसरातील गिधाडांची संख्या झपाट्याने घटल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्वेक्षणात २२ पांढऱ्या पाठीची गिधाडे आणि सहा लांब चोचीची गिधाडे आढळली.

गिधाडांची घटती संख्या रोखण्यासाठी मेस्त्री यांनी जवळपास तीन वर्षे गावात राहून त्यांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला. वृक्षतोडीमुळे घरट्यांसाठी आवश्यक अधिवास कमी होत असल्याचे, तर मृत जनावरे पुरण्याच्या व्यवस्थेमुळे नैसर्गिक खाद्याची उपलब्धता घटल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यानंतर गावकरी आणि वनविभागाच्या सहकार्याने गिधाडांसाठी स्वतंत्र खाद्यस्थळे तयार करण्यात आली. आवश्यक परवानग्या घेऊन सुरक्षित मृत जनावरांचे अवशेष तेथे आणण्याची व्यवस्था झाली.

सुमारे २००० पासून गावात वृक्षतोड रोखण्यास सुरुवात झाली. ‘सीस्कॅप’ संस्थेच्या सहकार्याने सुमारे ५० हजार झाडे लावण्याची योजना आखण्यात आली. गिधाडांच्या प्रजननासाठी शांत वातावरण मिळावे, यासाठी २००२ पासून गावात डीजे आणि लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी घालण्यात आली. सण-समारंभांतील फटाक्यांवरही निर्बंध आणण्यात आले. गावातील मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

या प्रयत्नांमुळे काही वर्षांत ११ हून अधिक सक्रिय घरटी तयार झाली आणि गिधाडांची संख्या ३४७ पर्यंत पोहोचली. मात्र, २०२० मधील निसर्ग चक्रीवादळामुळे अधिवासाचे नुकसान झाले आणि गिधाडांची संख्या सुमारे ३० टक्क्यांनी घटली.

या संकटानंतरही गावकऱ्यांनी माघार घेतली नाही. आजही परिसरातील ३४ देवरायांच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक देवराईत सुमारे ४० घरटी सुरक्षित ठेवता आल्यास जवळपास १,३०० घरट्यांचे संरक्षण करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते.

चिरगावने दाखवून दिले की, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी केवळ सरकारी योजना पुरेशा नसतात; त्यासाठी लोकसहभाग आणि जीवनशैलीत बदलही आवश्यक असतो. आनंदाचा गोंगाट कमी करून निसर्गाचा आवाज जपणाऱ्या चिरगावकरांचा हा आदर्श संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.

Previous Post

तिने दल लेकमधून दोन वर्षात काढला 36 हजार किलो कचरा

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.