• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

ती साडी नेसून उतरली फुटबॉलच्या मैदानात

घडवतेय आदिवासी खेळाडू

Admin by Admin
October 15, 2026
in Positive news
0
ती साडी नेसून उतरली फुटबॉलच्या मैदानात
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे पश्चिम बंगालहून

अंगावर पारंपरिक साडी, पायात खेळाचा उत्साह आणि डोळ्यांत आदिवासी मुलींचे भविष्य घडविण्याचे स्वप्न! फुटबॉलच्या मैदानावर साडी नेसून मुलींना प्रशिक्षण देणाऱ्या भारती मुडी यांचा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. स्वतःला फुटबॉलपटू होता आले नाही, तरी इतर मुलींची स्वप्ने साकार करण्यासाठी त्यांनी आयुष्य वाहून घेतले. गेल्या १७ वर्षांपासून त्या पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील गरीब आणि आदिवासी मुलींना विनामूल्य फुटबॉल प्रशिक्षण देत आहेत.

बांकुरा जिल्ह्यातील छटना ब्लॉकमधील डुमडुमी गावात वाढलेल्या भारती यांना लहानपणापासून फुटबॉलची आवड होती. गावातील मुलांसोबत खेळताना त्यांनी फुटबॉलचे धडे गिरवले. मात्र, गरिबी, सामाजिक बंधने आणि वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी झालेल्या विवाहामुळे त्यांचे फुटबॉलपटू होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. संसाराची जबाबदारी सांभाळताना त्यांना मैदानापासून दूर राहावे लागले.

२००९ मध्ये त्यांची मुलगी तानिया हिने वर्तमानपत्रात फुटबॉल सामन्याची जाहिरात पाहिली आणि खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारती यांनी पुन्हा मैदान गाठले. त्यांनी पतीच्या मदतीने मुलींचा फुटबॉल संघ उभारला. सुरुवातीला तानिया आणि तिच्या मैत्रिणींना प्रशिक्षण देणाऱ्या भारती यांचा हा उपक्रम पुढे अनेक आदिवासी मुलींसाठी आशेचा किरण ठरला. विशेष म्हणजे, घरातील आणि शेतातील कामे सांभाळून त्या दररोज मैदानावर येतात. साडी नेसूनच मुलींना ड्रिबलिंग, पासिंग, बचाव आणि चेंडूवर नियंत्रण ठेवण्याचे तंत्र शिकवतात. प्रशिक्षणासाठी त्या कोणतेही शुल्क घेत नाहीत.

अनेकदा स्वतःच्या पैशांतून फुटबॉल, बूट आणि आवश्यक साहित्यही खरेदी करतात.
मैदानातून रोजगारापर्यंतची झेप
भारती यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनी जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. काही खेळाडूंनी गोवा, चंदीगड आणि भोपाळ येथे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनाखालील सुमारे १८ खेळाडूंनी उच्च स्तरावर मजल मारली असून, १५ मुलींना नागरी स्वयंसेवक म्हणून नोकरी मिळाली आहे.

दूरच्या गावांतून येणाऱ्या काही मुलींच्या निवासाची आणि जेवणाची व्यवस्थाही भारती करतात. त्यांच्या पती शक्तीपाद मुडी यांची त्यांना सातत्याने साथ मिळते. त्यांची मुलगी तानियानेही प्रशिक्षणाचे कौशल्य आत्मसात केले असून, ती आईसोबत मुलींना फुटबॉलचे धडे देते.
फुटबॉलमधून स्वावलंबनाचा संदेश
आर्थिक अडचणी, पौष्टिक आहाराचा अभाव, खेळाच्या साहित्याची कमतरता आणि बालविवाह यांसारख्या आव्हानांशी भारती आजही झुंज देत आहेत. मात्र, फुटबॉलमुळे मुलींना आत्मविश्वास, शिस्त आणि रोजगाराच्या संधी मिळू शकतात, असा त्यांचा विश्वास आहे.
स्वतःचे स्वप्न अपूर्ण राहिले, तरी इतरांच्या स्वप्नांना नवी दिशा देता येते, हे भारती मुडी यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे.

साडी नेसून फुटबॉल शिकवणाऱ्या या प्रशिक्षकांसाठी मैदान म्हणजे केवळ खेळाचे ठिकाण नसून आदिवासी मुलींच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे.

Previous Post

गिधाडांच्या संवर्धनासाठी गावकऱ्यांचा अनोखा त्याग

Next Post

जलपर्णीतून साडी बनवण्याचा अनोखा प्रयोग!

Admin

Admin

Next Post
जलपर्णीतून साडी बनवण्याचा अनोखा प्रयोग!

जलपर्णीतून साडी बनवण्याचा अनोखा प्रयोग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.