• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

तिने दल लेकमधून दोन वर्षात काढला 36 हजार किलो कचरा

सिमरन इरशाद यांची अनोखी किमया

Admin by Admin
October 13, 2026
in Positive news
0
तिने दल लेकमधून दोन वर्षात काढला 36 हजार किलो कचरा
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे श्रीनगरहून

निसर्गाचे संवर्धन आणि पारंपरिक कलेचे जतन यांचा सुंदर संगम साधत श्रीनगरमधील ३५ वर्षीय उद्योजिका सिमरन इरशाद (कुलसुम इरशाद) यांनी एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. काश्मीरची शान असलेल्या प्रसिद्ध दल सरोवरातून त्यांनी गेल्या दोन वर्षांत तब्बल ३६ हजार किलो (३६ टन) कचरा आणि टाकाऊ जलवनस्पती बाहेर काढल्या आहेत. विशेष म्हणजे, या टाकाऊ वनस्पतींचा उपयोग करून त्यांनी ‘ग्रास मॅशे’ (Grass Mâché) हे पर्यावरणपूरक तंत्र विकसित केले असून, त्यातून आकर्षक हस्तकला वस्तू तयार केल्या जात आहेत.

सिमरन या पूर्वी पश्मीना कलाकार म्हणून कार्यरत होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या पारंपरिक ‘पेपर मॅशे’ या कलेशी जोडल्या गेल्या आहेत. मात्र, डिजिटल तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे रद्दी कागदाची उपलब्धता कमी होऊ लागल्याने त्यांनी पर्यायी कच्च्या मालाचा शोध सुरू केला. त्यातूनच दल सरोवरातील टाकाऊ गवत आणि जलवनस्पतींचा वापर करण्याची कल्पना त्यांना सुचली.

या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्यांनी तब्बल दोन वर्षे संशोधन आणि प्रयोग केले. वनस्पतींपासून लगदा तयार करून त्याचा वापर कागदनिर्मिती आणि विविध सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी कसा करता येईल, यावर त्यांनी मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नांतून ‘ग्रास मॅशे’ ही अभिनव कला विकसित झाली.

दल सरोवराच्या स्वच्छतेसाठी सिमरन दररोज बोटीने सरोवरात जाऊन सुमारे ५० किलो कचरा आणि टाकाऊ वनस्पती बाहेर काढतात. त्यांच्या या उपक्रमामुळे सरोवरातील जलवनस्पतींचे व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे. तसेच, टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त आणि आकर्षक उत्पादने तयार करण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.

सिमरन यांनी आतापर्यंत जवळपास ५० स्थानिक महिलांना या कलेचे मोफत प्रशिक्षण दिले आहे. या माध्यमातून महिलांना हस्तकलेचे कौशल्य आत्मसात करून उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होत आहे. पर्यावरण संवर्धन, पारंपरिक कलेचे जतन आणि महिला सक्षमीकरण या तिन्ही उद्दिष्टांची सांगड घालणारा सिमरन यांचा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

दल सरोवरातील टाकाऊ वनस्पतींना कलात्मक रूप देत त्यांनी ‘कचऱ्यातून संपत्ती’ निर्माण करण्याचा नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

Previous Post

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची नवी दारे!

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.