• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

विदर्भात १०० देवराया उभारण्याचा संकल्प

सयाजी शिंदेंच्या पाठपुराव्याला यश

Admin by Admin
October 7, 2026
in Positive news
0
विदर्भात १०० देवराया उभारण्याचा संकल्प
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे नागपूरहून

राखीव वनक्षेत्रात वृक्षारोपणाला परवानगी नाकारण्याच्या वन विभागाच्या भूमिकेला आक्षेप घेत ज्येष्ठ अभिनेते आणि पर्यावरण कार्यकर्ते सयाजी शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नागपूर जिल्ह्यातील बेला गावालगत ‘सह्याद्री देवराई फाऊंडेशन’च्या माध्यमातून देवराई उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, आगामी काळात संपूर्ण विदर्भात तब्बल १०० देवराया उभारण्याचा संकल्प शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

बेला ग्रामपंचायतीने गावालगत देवराई उभारण्यासाठी वन विभागाकडे जागेची मागणी केली होती. मात्र, संबंधित जागा राखीव वनक्षेत्र असल्याचे कारण देत वन विभागाने सुरुवातीला जागा देण्यास तसेच तेथे वृक्षारोपण करण्यास नकार दिला होता. या भूमिकेवर शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘वनक्षेत्रात झाडे लावता येत नसतील, तर निसर्ग संवर्धन कसे करायचे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

वनक्षेत्र म्हणून नोंद असलेल्या जागेवर प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात झाडे नसताना अतिक्रमण करून शेती केली जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अतिक्रमणाकडे दुर्लक्ष आणि वृक्षारोपणासाठी मात्र कायद्याचा आधार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला.
या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर शिंदे यांनी नागपूरमधील वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर वन विभागाच्या भूमिकेत बदल झाल्याचे समोर आले. वनक्षेत्रात वृक्षारोपण करता येत नाही, असा कोणताही नियम नसल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचा दावा शिंदे यांनी केला.

बेला गावालगत वृक्षारोपण करण्यास परवानगी देण्याबरोबरच तेथील अतिक्रमण हटविण्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.”कोण चूक आणि कोण योग्य, या वादात आता पडायचे नाही. जास्तीत जास्त वृक्षारोपण कसे करता येईल, यावर लक्ष केंद्रित करायचे आहे,” अशी भूमिका शिंदे यांनी स्पष्ट केली.

बेला परिसरातील सध्याच्या जागेबरोबरच आणखी २५ एकर जागेची मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, विदर्भातील पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर देवराया उभारण्याचा मानस शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आगामी काळात १०० देवराया उभारण्याचे उद्दिष्ट असून, प्रत्येक देवराईमध्ये किमान ५०० प्रजातींच्या वृक्ष व वनस्पतींचा समावेश करण्याची संकल्पना आहे. त्यामुळे स्थानिक जैवविविधता आणि परिसंस्था अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

गेल्या अनेक दशकांतील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून, दुष्काळ आणि बदलते हवामान यांचा सामना करण्यासाठी आता वृक्षारोपण व संवर्धनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

बेला येथील अतिक्रमण प्रत्यक्षात कधी हटविले जाते आणि देवराई उभारणीला किती वेग मिळतो, याकडे आता लक्ष लागले आहे.

Previous Post

इथे विद्यार्थ्यांना मिळतात प्रामाणिकपणाचे धडे

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.