• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

इथे विद्यार्थ्यांना मिळतात प्रामाणिकपणाचे धडे

विश्वासावर चालतो शाळेतच ‘शॉप ऑफ ऑनेस्टी’ उपक्रम

Admin by Admin
October 6, 2026
in Inspirational
0
इथे विद्यार्थ्यांना मिळतात प्रामाणिकपणाचे धडे
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पंजाबहून

विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, आत्मशिस्त आणि जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी पंजाबमधील सरकारी शाळांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ‘शॉप ऑफ ऑनेस्टी’ अर्थात ‘प्रामाणिकपणाचे दुकान’ आणि ‘सच दी दुकान’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या विश्वासावर चालणारी ही दुकाने चर्चेचा विषय ठरत आहेत. विशेष म्हणजे या दुकानांमध्ये दुकानदार नाही, विद्यार्थ्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्हीही नाही.

डोडा येथील एका सरकारी शाळेत २०२६ पासून हा प्रयोग सुरू करण्यात आला. दुकानात पेन, पेन्सिल, वही, रबर यांसारखे शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना गरजेनुसार वस्तू स्वतः घ्यायच्या आणि तिची निर्धारित किंमत तेथे ठेवलेल्या ‘मनी बॉक्स’मध्ये जमा करायची. कोणतीही व्यक्ती त्यांच्यावर लक्ष ठेवत नसल्याने संपूर्ण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणावर आधारित आहे.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांकडे त्या वेळी पैसे नसतील, तरी त्यांना साहित्य घेण्याची मुभा आहे. पैसे उपलब्ध झाल्यानंतर संबंधित रक्कम मनी बॉक्समध्ये जमा करता येते. त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये, याचीही काळजी घेतली जात आहे.

तसेच धुरी उपविभागातील बेनरा सरकारी शाळेतही गणिताच्या शिक्षिका देवी दयाल यांच्या पुढाकारातून ‘सच दी दुकान’ सुरू करण्यात आली. या दुकानासाठी स्वातंत्र्यदिनी सुमारे १,००० रुपयांचे स्टेशनरी साहित्य ठेवण्यात आले. काही दिवसांत विद्यार्थ्यांनी ६०० रुपयांहून अधिक रक्कम जमा केल्याचे शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आले. पहिल्या महिन्यात दुकानातून साहित्य घेणाऱ्या ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे पैसे भरल्याचे दयाल यांनी सांगितले. मात्र, अंतिम उद्दिष्ट १०० टक्के प्रामाणिकपणाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमामागे केवळ वस्तू उपलब्ध करून देणे हा उद्देश नाही. कोणी पाहत नसतानाही योग्य तेच करण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, आत्मशिस्त वाढवणे आणि शिक्षक-विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे नाते मजबूत करणे, हा त्यामागील हेतू आहे.

अशाच प्रकारचे ‘ऑनेस्टी शॉप’ पंजाबमधील राजेवाल गावातील भाई पुरण भगत सिंह मेमोरियल स्कूलमध्येही सुरू करण्यात आले होते. त्यामुळे शिक्षणात मूल्यांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या या प्रयोगाला विविध सरकारी व ग्रामीण शाळांमध्ये प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन वर्तनातून मूल्यांची जडणघडण करण्याचा हा प्रयत्न ठरत आहे. प्रामाणिकपणाची परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव न आणता त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची भूमिका या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.

Previous Post

पृथ्वीक प्रतापने घेतली मराठी शाळा दत्तक

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.