• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर ‘ती’ तैनात

सियाचीनच्या रणभूमीवर इतिहास; कॅप्टन शिवा चौहान ठरल्या पहिल्या महिला अधिकारी

Admin by Admin
July 25, 2026
in Inspirational
0
जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर ‘ती’ तैनात
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज | प्रतिनिधी

भारतीय लष्कराच्या इतिहासात अभिमानास्पद नवा अध्याय लिहिला गेला आहे. कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी मानल्या जाणाऱ्या सियाचीन ग्लेशिअरवरील कुमार पोस्टवर प्रत्यक्ष ऑपरेशनल तैनात होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. समुद्रसपाटीपासून सुमारे १५,६३२ फूट उंचीवर असलेल्या या अत्यंत दुर्गम आणि प्रतिकूल ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राजस्थानातील उदयपूर येथील रहिवासी असलेल्या शिवा चौहान यांनी उदयपूरमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘टेक्नो एनजेआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. लहानपणापासूनच भारतीय सशस्त्र दलात सेवा करण्याचे स्वप्न त्यांनी जपले आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

सियाचीनमध्ये नियुक्तीपूर्वी त्यांना सियाचीन बॅटल स्कूलमध्ये अत्यंत कठीण प्रशिक्षण देण्यात आले. सहनशक्तीची कसोटी, बर्फाच्या भिंतींवर चढाई, हिमस्खलनातून बचाव, तसेच प्रतिकूल हवामानातील संरक्षणात्मक तंत्र अशा अनेक आव्हानात्मक प्रशिक्षणातून त्या यशस्वीपणे पार पडल्या.

भारतीय लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्समधील अधिकारी म्हणून कॅप्टन चौहान यांच्या नेतृत्वाखालील सेपर्सची टीम सियाचीन परिसरात विविध लढाऊ अभियांत्रिकी आणि सामरिक जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.

यापूर्वी जुलै २०२२ मध्ये कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित सियाचीन युद्ध स्मारक ते कारगिल युद्ध स्मारक या ‘सुरा सोई’ सायकल मोहिमेचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले होते. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच सियाचीन बॅटल स्कूलमध्ये विशेष प्रशिक्षणासाठी त्यांची निवड करण्यात आली.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये प्रशिक्षणादरम्यान शिवा चौहान यांनी असामान्य जिद्द आणि नेतृत्वगुण दाखवले. त्यानंतर मे २०२१ मध्ये त्यांची अभियंता रेजिमेंटमध्ये नियुक्ती करण्यात आली.

कॅप्टन शिवा चौहान यांच्या या ऐतिहासिक नियुक्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केले. ३ जानेवारी रोजी त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना, “कॅप्टन शिवा चौहान यांची ही कामगिरी भारताच्या महिला शक्तीचे प्रतीक असून प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे,” असे म्हटले.

कॅप्टन शिवा चौहान यांची सियाचीनवरील नियुक्ती ही केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसून भारतीय लष्करातील महिलांच्या वाढत्या सहभागाची आणि त्यांच्या कर्तृत्वाची प्रेरणादायी नोंद ठरली आहे.

Previous Post

जगातील पहिले लहान मुलांचे ढोलताशा पथक पुण्यात सुरू

Next Post

मीराबाई चानुने केली सुवर्णपदाची हॅट्ट्रीक!

Admin

Admin

Next Post
मीराबाई चानुने केली सुवर्णपदाची हॅट्ट्रीक!

मीराबाई चानुने केली सुवर्णपदाची हॅट्ट्रीक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.