• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

माजी विद्यार्थ्याने केला सरकारी शाळेचा कायापालट

जुन्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी डॉक्टरांनी खर्च केले तब्बल १४ कोटी रुपये!

Admin by Admin
November 3, 2026
in Positive news
0
माजी विद्यार्थ्याने केला सरकारी शाळेचा कायापालट
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे बंगळुरूहून

माणूस कितीही मोठा झाला, कितीही यशस्वी झाला, तरी त्याला घडवणाऱ्या मातीचे आणि संस्थेचे ऋण त्याने विसरता कामा नये, याचा आदर्श कर्नाटकातील एका डॉक्टरांनी समाजासमोर ठेवला आहे. ज्या सरकारी शाळेत शिक्षण घेऊन त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले, त्याच शाळेचा कायापालट करण्यासाठी त्यांनी तब्बल १४ कोटी रुपये खर्च केले आहेत. डॉ. एच. एम. वेंकटप्पा यांच्या या दातृत्वामुळे एका ग्रामीण सरकारी शाळेचे रूपांतर आता अत्याधुनिक शैक्षणिक संकुलात झाले आहे.

कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील चन्नपट्टण तालुक्यातील होंगानूर गावात ही शाळा आहे. डॉ. वेंकटप्पा यांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. १९४९ ते १९५७ या काळात त्यांनी याच सरकारी शाळेत अत्यंत मर्यादित सुविधांमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले. पुढे जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी एमबीबीएस आणि एमडी या वैद्यकीय पदव्या संपादन केल्या. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवत ‘कान्वा डायग्नोस्टिक सेंटर’ची स्थापना केली. २०२२ मध्ये गावाला भेट दिल्यानंतर त्यांना आपल्या बालपणीच्या शाळेची दयनीय अवस्था पाहून मोठी खंत वाटली.

आपण ज्या शाळेमुळे घडलो, तिचे ऋण फेडण्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानुसार जुन्या इमारतीचे बांधकाम पाडून सुमारे अडीच वर्षांत ४.५ एकर परिसरात स्वतःच्या कमाईतून १४ कोटी रुपये खर्च करून नवीन शाळा उभारली. या शाळेला आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ ‘चेन्नम्मा मंचेगौडा कर्नाटक पब्लिक स्कूल’ असे नाव देण्यात आले आहे.

या शाळेत ५१ प्रशस्त वर्गखोल्या, डिजिटल स्मार्टबोर्ड, ४० संगणकांची प्रयोगशाळा, विज्ञान व गणित प्रयोगशाळा आणि तब्बल १० हजार पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे. याशिवाय क्रीडांगण, बास्केटबॉल कोर्ट, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्रणा आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सोयीसुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे, येथे एलकेजीपासून बारावीपर्यंत कन्नड आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून पूर्णपणे मोफत शिक्षण दिले जात आहे. सध्या सुमारे ८५० विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. जवळपासच्या १२ गावांतील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी दोन स्कूल बसची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.

डॉ. वेंकटप्पा यांचे योगदान केवळ शाळेच्या बांधकामापुरते मर्यादित नाही. शाळेच्या देखभालीसाठी ते दरवर्षी १० लाख रुपये देणार असून अतिथी शिक्षकांनाही अतिरिक्त मानधन देत आहेत. स्वतः यशस्वी होणे ही मोठी गोष्ट; पण आपल्या यशाचा उपयोग इतरांचे भविष्य घडवण्यासाठी करणे, हेच खरे मोठेपण! डॉ. वेंकटप्पा यांनी आपल्या कृतीतून शिक्षणसेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

Previous Post

भंगारातून बनवले धूळमुक्त थ्रेशर

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.