• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत २५० ‘पिंक पार्क’ उभारणार!

आस्था कुंजमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर एमसीडीचा निर्णय

Admin by Admin
October 17, 2026
in Positive news
0
महिलांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत २५० ‘पिंक पार्क’ उभारणार!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे नवी दिल्लीहून

राजधानी दिल्लीत महिलांना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली महानगरपालिकेने (एमसीडी) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दिल्लीतील २५० प्रभागांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे केवळ महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र ‘पिंक पार्क’ विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीतील आस्था कुंज पार्क परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर एमसीडीच्या स्थायी समितीने हा निर्णय घेतला आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षा सत्या शर्मा यांनी या योजनेसाठी सर्व विभागांमध्ये सर्वेक्षण करून योग्य जागा निश्चित करण्याचे निर्देश उद्यान विभागाला दिले आहेत. प्रस्तावित उद्यानांमध्ये केवळ महिला आणि लहान मुलांनाच प्रवेश दिला जाणार असून, प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी महिला सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. तसेच, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या उद्यानांमध्ये खुल्या व्यायामशाळा, स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था असेल.

उद्यानांना गुलाबी रंगाची सजावट करून महिला सक्षमीकरणाचे संदेशही प्रदर्शित केले जातील.
पावसाचे पाणी साठविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणाही उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, ही उद्याने विकसित करण्यासाठी अद्याप निश्चित कालमर्यादा जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मार्च २०२२ मध्ये माता सुंदरी मार्गाजवळ सुमारे २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या प्रायोगिक पिंक पार्कची कालांतराने दुरवस्था झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नव्या उद्यानांची देखभाल आणि सुरक्षा व्यवस्था सातत्याने कशी राखली जाणार, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

पूर्व दिल्ली आरडब्ल्यूए संयुक्त आघाडीचे प्रमुख बी. एस. व्होरा यांनी केवळ महिलांसाठी स्वतंत्र उद्याने राखण्याऐवजी सर्व उद्यानांमध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्याची गरज व्यक्त केली. तर ‘सेफ्टीपिन’च्या सह-संस्थापक कल्पना विश्वनाथ यांनीही अशा स्वतंत्र उद्यानांपेक्षा सर्व सार्वजनिक ठिकाणी पुरेशी प्रकाशव्यवस्था, सुरक्षा रक्षक आणि नियमित गस्त असणे आवश्यक असल्याचे मत मांडले.

एमसीडीच्या देखरेखीखाली दिल्लीभरात १५ हजारांहून अधिक उद्याने आहेत. त्यामुळे केवळ २५० पिंक पार्क उभारण्याबरोबरच उर्वरित उद्यानांमधील सुरक्षेच्या त्रुटी दूर करणेही महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या योजनेमुळे महिलांना सुरक्षित सार्वजनिक जागा मिळतील का, हे तिच्या प्रभावी अंमलबजावणीवर आणि नियमित देखभालीवर अवलंबून असेल.

Previous Post

जलपर्णीतून साडी बनवण्याचा अनोखा प्रयोग!

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.