• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

मुळशीच्या लेकीची गगनभरारी!

जिल्हा परिषद शाळेतील जानवी शिंदेची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

Admin by Admin
August 26, 2026
in my news pune
0
मुळशीच्या लेकीची गगनभरारी!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या जानवी शिंदे हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या विशेष अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना मिळवलेल्या या यशामुळे जानवीने नेरे गावासह संपूर्ण मुळशी तालुक्याची मान उंचावली आहे.

जानवीने कासारसाई आणि बावधन येथे झालेल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यानंतरच्या निवड प्रक्रियेतील विविध टप्प्यांवरही तिने आपली गुणवत्ता सिद्ध करत अंतिम निवडीत स्थान मिळवले. जिद्द, मेहनत, सातत्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने ही खडतर निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार केली.

ग्रामीण शाळेतील विद्यार्थिनीची अंतराळ संशोधन संस्थेपर्यंतची झेप महत्वपूर्ण मानली जात आहे.
इस्रो चा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अंतराळ संशोधनाचे जग जवळून समजून घेण्याची महत्त्वपूर्ण संधी असते. देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संस्थेला भेट देण्याची संधी जानवीला मिळणार असल्याने तिच्या शैक्षणिक प्रवासातील हा निश्चितच महत्त्वाचा आणि प्रेरणादायी टप्पा ठरणार आहे.

जानवी चे वडील अविनाश शिंदे हे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडामालक आहेत.जानवीच्या या यशामागे तिच्या कुटुंबीयांसोबतच शिक्षक आणि मार्गदर्शकांचेही योगदान आहे. तिच्या यशाबद्दल शिक्षक, ग्रामस्थ, नातेवाईक आणि मार्गदर्शकांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन जानवीने मिळवलेले यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि उपलब्ध संधींचा योग्य वापर केला, तर ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी स्वप्ने साकार करू शकतात, हे तिच्या यशाने दाखवून दिले आहे.

गावाकडच्या मातीतूनही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि जिद्द व मेहनतीच्या बळावर ती प्रत्यक्षात आणता येतात, हे जानवीने आपल्या यशातून सिद्ध केले आहे.

Previous Post

विनिशा उमाशंकरच्या ‘आयर्न मॅक्स’ने कोळशाला दिला सौरऊर्जेचा पर्याय

Next Post

ग्रामविकासाचा अद्वितीय पाटोदा पॅटर्न

Admin

Admin

Next Post
ग्रामविकासाचा अद्वितीय पाटोदा पॅटर्न

ग्रामविकासाचा अद्वितीय पाटोदा पॅटर्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.