• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पुण्यात ‘असिस्टमेट’ची सेवा सुरू

एका क्लिकवर मिळणार विश्वासू मदतनीस

Admin by Admin
September 17, 2026
in my news pune
0
पुण्यात ‘असिस्टमेट’ची सेवा सुरू
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

आजच्या धावपळीच्या जीवनात वेळेअभावी अनेकांना दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. एखाद्या कामासाठी फक्त विश्वासू व्यक्तीची मदत हवी असते; मात्र त्यासाठी नातेवाईक किंवा मित्र उपलब्ध असतीलच असे नाही. हीच गरज ओळखून बीड जिल्ह्यातील २६ वर्षीय तरुण उद्योजक ऋषिकेश महादेव झिंगरे यांनी ‘असिस्टमेट’ (AssistMate) या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे.

‘असिस्टमेट’च्या माध्यमातून गरजेनुसार सत्यापित आणि प्रशिक्षित मदतनीस उपलब्ध करून दिले जातात. खरेदीसाठी बाजारात जाणे, रुग्णालयात सोबत जाणे, बँकेतील कामे, विमानतळावरील मदत किंवा इतर दैनंदिन कामांसाठी या मदतनीसांची सेवा घेता येते. त्यामुळे एखाद्या छोट्या कामासाठीही वेळ काढण्याची किंवा कोणाची मदत मिळेपर्यंत प्रतीक्षा करण्याची गरज कमी होऊ शकते.

सध्या या उपक्रमाची सेवा पुणे शहरात सुरू करण्यात आली असून, अवघ्या ७९ रुपयांपासून मदतनीस उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नोकरदार वर्ग, ज्येष्ठ नागरिक तसेच वेळेची कमतरता असलेल्या नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

‘मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूकच आवश्यक असते,’ हा समज बाजूला ठेवत ऋषिकेश यांनी रोजच्या जीवनातील एका साध्या समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाने वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी लोकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेली ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.

‘असिस्टमेट’चा उद्देश केवळ व्यवसाय उभारणे एवढाच नसून, गरजेच्या वेळी विश्वासू मदत उपलब्ध करून देणे, नागरिकांचा वेळ वाचवणे आणि त्यांची धावपळ व मेहनत कमी करणे, असा आहे. या उपक्रमातून भविष्यात दैनंदिन कामांसाठी मदत घेण्याची पद्धत अधिक सुलभ होऊ शकते.

“मोठी स्वप्नं पाहा… छोटी कामं असिस्टमेट करेल!” या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या उपक्रमाची सध्या पुण्यातील नागरिकांमध्ये ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
संपर्क : ९६७३८१०६९१
अधिक माहितीसाठी : www.assistmate.in

Previous Post

पाणी टंचाईच्या समस्येवर आयएएस अधिकाऱ्याने केली मात

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.