• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

जागतिक कुस्तीमध्ये भारतीय मुलींचा दबदबा…!

Admin by Admin
August 25, 2024
in Success Story
0

स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)

आजची चांगली बातमी आहे जॉर्डनहून…

जॉर्डन येथे सुरू असलेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी आपला दबदबा निर्माण केला असून कुस्तीच्या विविध वजन गटात देशासाठी एक दोन नाहीतर ४ सुर्वणपदके पदके जिंकली आहेत. भारतीय कुस्तीपटूंच्या या कामगिरीमुळे ऑलिम्पिकमधील कुस्तीतील अपयशाचे दु:ख काहीसे कमी झाले आहे.

४३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत आदिती कुमारीने ग्रीसच्या मारिया लुईझा गिका हिचा ७-० असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नेहाने जपानच्या सो त्सुत्सुईचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. ६५ किलो वजनी गटात पुलकितने डारिया फ्रोलोव्हाचा ६-३ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. मानसी लाथेरने ७३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत हाना पिरस्काया हिला हरवून सुवर्णपदक जिंकले. सुवर्णपदक जिंकून या चार कुस्तीपटूंनी जागतिक स्पर्धेत भारतीय कुस्तीचा दबदबा प्रस्थापित केला. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी मानसी लाथेरचे ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे. लाथेर ही हरियाणाच्या जिंदमधील जुलाना भागातील लाजवाना कलान गावची रहिवासी आहे.

ऑलिम्पिकमध्ये हुकले सुवर्णपदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्येही भारताने कुस्तीमध्ये चांगली कामगिरी केली होती. अमन सेहरावतने ५७ किलो वजनी गटात सलग ३ विजय नोंदवून कांस्यपदक पटकावले होते. ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत अमेरिकन कुस्तीपटूला पराभूत करून विनेश देशाला २०२४ च्या ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्ण मिळवून देईल, असा विश्वास होता. पण हे होऊ शकले नाही.अंतिम सामन्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी वजन जास्त असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आले. तपासणीत विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. यामुळे ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

Previous Post

५० पैशांची कॉफी ते १०० कोटींचे साम्राज्य!

Next Post

मावळच्या बालगायिकेने गाठली सेमीफायनल!

Admin

Admin

Next Post
मावळच्या बालगायिकेने गाठली सेमीफायनल!

मावळच्या बालगायिकेने गाठली सेमीफायनल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.