• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

मावळच्या बालगायिकेने गाठली सेमीफायनल!

Admin by Admin
August 25, 2024
in Inspirational
0
मावळच्या बालगायिकेने गाठली सेमीफायनल!

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

स्टार प्रवाह मालिकेवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ या रियालिटी शोने प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे. या कार्यक्रमात मावळची कलाकार अवनी आशुतोष परांजपे हिने जुगलबंदी सादर करुन स्पर्धेचे सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे तिच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

गीत बागडे बरोबर “उगवला चंद्र पुनवेचा” हे नाट्यगीत, “डोल डोलते वाऱ्यावर” हे कोळीगीत, तराणा , सरगम आणि पाश्चात्य फ्यूजन असलेल्या या जुगलबंदीचे परीक्षक सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी जागेवर उभे राहून मानवंदना देऊन त्यांच्याजवळ जाऊन भरभरून कौतुक केले. ओपी परफॉर्मन्सचा पुष्पवर्षाव झाला. ‘आवाज वाढव’ अशी प्रोत्साहन पर आरोळी मिळाली. सचिन पिळगावकर यांनी त्यांची स्पेशल शंभर रुपयाची नोट देऊन दोघींचे कौतुक केले. घंटा नादही केला आणि जुगलबंदीतील दोन्ही कलाकार सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत, असा वेगळा निर्णय दिला.

अवनी परांजपे ही तळेगावमधील ‘कलापिनी’ संस्थेच्या वातावरणात घडलेली बालकलाकार अंजली कराडकर यांच्याकडून गायन कीर्तन, नाट्यभिनय यांचे शिक्षण घेत आहे. कलापिनीचे बालनाट्य शिबिर, दिवाळी पहाट अशा कार्यक्रमात अवनीचा सहभाग असतो. ‘कलापिनी’ आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा, बालकथा नाट्य स्पर्धा, यात अवनीने प्रथम पारितोषिके मिळवली आहेत. अवनी व अंजली कराडकर यांची बेल्जियम आणि नेदरलँड्स या ठिकाणी कीर्तने झाली आहेत. अवनी कथक नृत्याचेही शिक्षण घेत आहे, भारतीय विद्या भवनच्या सुलोचना नातू विद्या मंदिरात इयत्ता नववीमध्ये ती शिकत आहे. आपले गायन कौशल्य, गुणवत्ता, आणि रसिकांचे पाठबळ आशीर्वाद यामुळे तळेगावचे व मावळचे नाव गाजवेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

Previous Post

जागतिक कुस्तीमध्ये भारतीय मुलींचा दबदबा…!

Next Post

खडतर परिस्थितीचा सामना करत ‘ती’ बनली आयएएस

Admin

Admin

Next Post
खडतर परिस्थितीचा सामना करत ‘ती’ बनली आयएएस

खडतर परिस्थितीचा सामना करत 'ती' बनली आयएएस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.