• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

आधुनिक सावित्रीने वाचवले पतीचे प्राण…पतीला वाचवण्यासाठी पत्नीची ४० फूट विहिरीत उडी

Admin by Admin
February 10, 2025
in Positive news
0
आधुनिक सावित्रीने वाचवले पतीचे प्राण…पतीला वाचवण्यासाठी पत्नीची ४० फूट विहिरीत उडी

स्वदेस न्यूज( प्रतिनिधी):-
आजची बातमी आहे केरळहून

केरळच्या एर्नाकुलम इथे एक पत्नी पद्मन ही पतीला वाचवण्यासाठी ४० फूट खोल विहिरीत उतरली. ६४ वर्षीय रामेसन बेशुद्ध अवस्थेत विहिरीत अडकले होते. त्यावेळी कुठलाही विचार न करता पत्नीने पतीला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली. त्यानंतर बचावासाठी आलेल्या प्रशासकीय यंत्रणांनी दोघांनाही सुखरूप विहिरीच्या बाहेर काढले.
पिरावोम नगरपालिकेतील निवृत्त अधिकारी रामेसन हे त्यांच्या अंगणातील एका विहिरीजवळ उभे राहून मिरच्या तोडत होते. त्यावेळी ज्या झाडाच्या फांदीवर ते पाय ठेवून उभे होते, ती तुटली त्यामुळे रामेसन यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. ही विहिर ४० फूट खोल होती. त्यात ५ फुटापर्यंत पाणी होते. रामेसन यांच्या पत्नी पद्मन यांनी ही घटना पाहिली तेव्हा त्या धावत विहिरीजवळ आल्या. त्या बाकी काही विचार न करता रस्सीच्या सहाय्याने विहिरीत उतरल्या. त्यांनी रामेसन यांना फायर ब्रिगेडची गाडी येत नाही तोपर्यंत पकडून धरले होते.
विहिरीत उतरण्यापूर्वी पत्नीने पतीला बाहेर काढण्यासाठी प्लास्टिकची दोरी खाली फेकली परंतु पतीला दुखापत झाल्याने त्यांना वरती येता आले नाही. तेव्हा पत्नीने आसपासच्या लोकांना सांगून मदतीसाठी फायर ब्रिगेडला बोलावले. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पतीला वाचवण्यासाठी त्या विहिरीत उतरल्या. रस्सीच्या मदतीने पत्नी पद्मन विहिरीत उतरत होत्या, मात्र त्यांच्या हाताची पकड सैल झाल्याने त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा निर्णय घेतला. पत्नी पद्मन या पतीला पाण्याबाहेर काढून एका दगडाला टेकून उभ्या राहिल्या होत्या.
पती-पत्नी दोघेही विहिरीत होते, तोपर्यंत स्थानिकांनी फायर ब्रिगेडला कॉल करून बोलावले. फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी रस्सी आणि जाळीच्या मदतीने दोघांना वाचवले आणि त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेले. या दोघांना किरकोळ जखमा झाल्या असून सोशल मीडियावर या घटनेची बरीच चर्चा आहे. पतीचा जीव वाचवण्यासाठी पत्नीने केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

मुलांना संघर्षाचे मोल कळू द्या : विश्वास नांगरे पाटील …ऐश्वर्य व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पर्वात बहुमोल मार्गदर्शन

Next Post

नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेचा विशेष सन्मान

Admin

Admin

Next Post
नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेचा विशेष सन्मान

नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेचा विशेष सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.