• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; ढोलताशांचा गजर! ऑलिम्पिकवीर स्वप्निलचे जंगी स्वागत

Admin by Admin
August 22, 2024
in Inspirational
1
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी; ढोलताशांचा गजर! ऑलिम्पिकवीर स्वप्निलचे जंगी स्वागत
  • कोल्हापूरकरांकडून प्रेमाचा वर्षाव 
  • वाजतगाजत काढली मिरवणूक 

स्वदेस न्यूज :- (प्रतिनिधी)

आजची चांगली बातमी आहे कोल्हापूरहून

 

पॅरिस आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी तिसरे पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे त्याच्या गावी कोल्हापूरात पोहोचताच महाराष्ट्राच्या सुपुत्राचे जंगी स्वागत करण्यासाठी कोल्हापुरकरांनी गर्दी केली. हेलिकाॅप्टरमधून त्याच्यावर पुष्पवृष्टी करून ढोलताशांच्या गजरात त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि शहरातून त्याची जोरदार मिरवणूकसुद्धा काढली.

तब्बल 72 वर्षानंतर महाराष्ट्राकडे पदक जिंकवून आणण्याचा मान स्वप्नीलने पटकावला. स्वप्नीलने आॅलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक जिंकले आणि इतिहास रचला. जिल्हा प्रशासनातर्फे स्वप्नीलची जंगी मिरवणूक काढून त्याचा सत्कारही केला जाणार आहे. त्याच्या स्वागतासाठी आता अवघ्या कोल्हापुरकरांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसला. भारतात आल्यानंतर प्रथमच आता तो त्याच्या गावी पोहोचला आहे. कांबळवाडीतील आपल्या घरी पोहोचण्याआधी कोल्हापुरातील लोक जगात भारी ही गोष्ट ज्याने खरी करुन दाखवली त्या स्वप्नीलसाठी लोक कमालीचा उत्साह घेऊन रस्त्यावर उतरलेले दिसले. याआधी पुणे विमानतळावर स्वप्नीलचे थाटामाटात स्वागत केले गेले होते.
कांबळवाडीसारख्या छोट्या गावातून इतक्या मोठ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्यापासून ते पदक मिळवणे त्याचा हा खडतर प्रवास खरंच लहान मुलांसाठी प्रोत्साहन देणारा आहे. आपल्या जगात भारी असलेल्या दादाच्या स्वागतासाठी लहान मुलांनीही तुफान गर्दी केलेली दिसली.

स्वप्नील फेटा बांघून पूर्ण मराठमोळ्या लूकमध्ये दिसला. कोल्हापूरात या आॅलिम्पिक चॅम्पियनच्या स्वागतासाठी हॅलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. कोल्हापुरकरांनी अगदी नादखुळ्या पद्धतीने स्वप्नीलची मिरवणुक काढली. कोल्हापूरकरांनी चॅम्पियनच्या स्वागतासाठी ढोल, ताशा, हलगी आणि झांजपथक या सगळ्याच्या गजरात थाटामाटात ताराराणी चौक ते दसरा चौकपर्यंत मिरवणुक काढली.

स्वप्नील ठरला पहिला भारतीय 

स्वप्नीलने पॅरिस आॅलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफेल थ्री पोझीशन प्रकारात भारताला पदक मिळवून दिले. खरंतर अगदी मोक्याच्या क्षणी बरोबर नेम साधत त्याने हा पराक्रम केला. या कांस्यपदकांसह स्वप्नीलने नेमबाजीत एक नवा इतिहासही रचला. रायफेल थ्री पोझीशन प्रकारात भारताला पदक मिळवून देणारा तो पहिला भारतीय ठरला. खाशाबा जाधवनंतर आॅलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा मान उंचवणारा तो दुसरा खेळाडू ठरला. महाराष्ट्र शासनाकडूनही स्वप्नीलनच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला.

Previous Post

गरवारे महाविद्यालयात रंगले अनोखे समीक्षा संमेलन!

Next Post

कॅन्सरला मात देऊन झाली करोडोंची मालकीण!

Admin

Admin

Next Post
कॅन्सरला मात देऊन झाली करोडोंची मालकीण!

कॅन्सरला मात देऊन झाली करोडोंची मालकीण!

Comments 1

  1. Sushil says:
    2 years ago

    Abhinandan

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.