• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

महिलांवरील अन्यायाविरोधात सूर्यदत्तचा शांतता मोर्चा

Admin by Admin
September 11, 2024
in my news pune
0
महिलांवरील अन्यायाविरोधात सूर्यदत्तचा शांतता मोर्चा

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची बातमी आहे पुण्यातून…

 

पश्चिम बंगालमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचार असो की, बदलापूर येथील चिमुकलीवरील अन्याय असो, महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी, महिलांवरील अन्यायाविरोधात जागृती करण्यासाठी सूर्यदत्त विधी महाविद्यालयाच्या (एसएलसी) वतीने बावधन परिसरात शांतता मोर्चा काढण्यात आला. सुर्यदत्त विधी महाविद्यालयापासून एनडीए रोडपर्यंत आणि पुन्हा बवधनमध्ये बॅनर आणि पोस्टर्स हातात घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. महिला सुरक्षा आणि संरक्षणाबद्दलची आपली तीव्र चिंता आणि संवेदनशीलता व्यक्त करण्यासाठी आणि पीडित महिलेप्रती ऐक्य दर्शवण्याच्या उद्देशाने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या शांतता मोर्चामध्ये ‘एसएलसी’ आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीचे (एससीएमआयआरटी) प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

या संवेदनशील घटनांवर आवाज उठविण्यासाठी नैतिक, सामाजिक आणि मानवतेची जबाबदारी म्हणून या सर्व सहभागींनी निषेध नोंदवला. डॉ. मोनिका सेहरावत यांच्या पुढाकाराने डॉ. मंकुराणी गोयल, केतकी बापट, विजयदीप, निलेश, सुप्रिया सिरसाट, आंशिका जोशी, तेजल निकम व सहकाऱ्यांनी मोर्चाचे यशस्वी संयोजन केले. हिंजवडी पोलिस स्टेशनने सुरक्षित वाहतूक व्यवस्था पुरवली.
एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर लोकांची मते व्यक्त होतात. पश्चिम बंगाल आणि बदलापूर येथील घटनेने संपूर्ण भारताला हादरवून टाकले आहे. या क्रूर, अमानवीय घटनांनंतर महिलांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आपण कुठे कमी पडलो याचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे. सूर्यदत्तमध्ये नेहमी स्त्री-पुरुष समानता आणि महिलांचा सन्मान याचा संस्कार दिला जातो. आज समाजामध्ये महिलांचा सन्मान करण्यास शिकवण्याची गरज भासू लागली आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली, तर अशा घटनांना आळा बसेल, अशी प्रतिक्रिया प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी यावेळी दिली.

Previous Post

विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन ‘तो’ लावतोय ज्ञानाचा दीप!

Next Post

पुण्यातील विद्यार्थ्यांनी गणरायासमोर केला वाचनाचा संकल्प

Admin

Admin

Next Post
पुण्यातील विद्यार्थ्यांनी गणरायासमोर केला वाचनाचा संकल्प

पुण्यातील विद्यार्थ्यांनी गणरायासमोर केला वाचनाचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.