• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

वृद्धांचा एकटेपणा दूर करणार ‘गुडफेलोज’

Admin by Admin
August 13, 2025
in Inspirational
0
वृद्धांचा एकटेपणा दूर करणार ‘गुडफेलोज’

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी)
आजची चांगली बातमी आहे मुंबईहून
मूळचा पुणेकर तरुण शांतनू नायडू याने ‘गुडफेलोज’ नावाचा स्टार्टअप सुरू केला आहे. ज्येष्ठांना ‘कंपनी’ देणारी ही कंपनी आहे. त्याच्या कोर्‍या करकरीत स्टार्टअपला थेट टाटांकडून फंडिंग मिळाले आहे. या नव्या स्टार्टअपमध्ये टाटांनी गुंतवणूक केली आहे. ज्येष्ठांना ‘कंपनी’ देणार्‍या तरुण फौजेची ही कंपनी आहे. ज्येष्ठ नागरिक आणि युवा पदवीधरांची गाठ घालून देत त्यांच्यामध्ये अर्थपूर्ण मैत्री निर्माण करण्यासाठी ‘गुडफेलोज’ हे स्टार्ट-अप सुरू झाले आहे.
आजी-आजोबांशी ऋणानुबंध तयार करणारी सेवा असे या नव्या स्टार्टअपचे स्वरूप आहे. शांतनू याने निकी ठाकूर आणि गार्गी सांडू यांच्यासोबत ही कल्पना प्रत्यक्षात आणली. गुडफेलोजची ही सेवा सध्या मुंबईमध्ये उपलब्ध आहे. मुंबईच्या पुढे इतर शहरांमध्येही ते विस्तारले आहे. आता या सेवेसाठी नावनोंदणी खुली आहे.
ज्येष्ठ नागरिक द गुडफेलोज इन या साईटवर साइनअप करून अथवा ८७७९५२४३०७ वर मिस्ड कॉल देऊन सेवांचा लाभ घेऊ शकतात. ‘गुडफेलोज’चे ग्रॅण्डपाल्स अर्थात आजी-आजोबांशी तयार होणारे ऋणानुबंध केवळ दिखाव्यापुरते नाहीत तर खरोखरीचे आणि अर्थपूर्ण असावेत याची खबरदारी घेणे आव्हानात्मक पण तितकेच समाधानकारक होते असे कंपनीच्या टीमचे म्हणणे आहे. गुडफेलोजद्वारे दिल्या जाणार्‍या सेवांबद्दल सांगायचे तर एखाद्या नातवंडाकडून केल्या जातील अशा सर्व गोष्टींचा त्यात समावेश आहे. भारतामध्ये जवळजवळ १.५ कोटी ज्येष्ठ नागरिक एकतर जोडीदार गमावल्याने किंवा नोकरीच्या अटळ गरजेपोटी कुटुंब इतरत्र स्थलांतरीत झाल्याने एकट्याने आयुष्य कंठत आहेत. यातील अनेकजणांपाशी काळजीवाहू व्यक्ती आहेत किंवा ई-कॉमर्ससारख्या उपयुक्ततेशी निगडित गरजा पूर्ण करणार्‍या स्टार्टअप कंपन्या आहेत, पण त्यांच्या ढासळत्या मानसिक आरोग्याला एकटेपणा, सोबतीचा अभाव हे घटक प्रामुख्याने जबाबदार आहेत. टाटांनी शांतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली.
याबाबत शांतनू नायडू म्हणाला, ‘सोबतीची व्याख्या ही वेगवेगळ्या माणसांसाठी वेगवेगळी असते. या गोष्टीवर या स्टाटअपने भर दिला आहे. काहींसाठी त्याचा अर्थ एकत्र बसून चित्रपट पाहणे असा असतो, काहींसाठी जुन्या दिवसांतल्या आठवणी सांगत बसणे, चालायला जाणे म्हणजे सोबत असते तर काही जणांना अगदी काही न करता केवळ सोबत कुणाचातरी वावर असणे पुरेसे असते आणि आम्ही या सर्व गरजा लक्षात घेतो. टाटा यांच्या पाठिंब्यामुळे आमची विश्वासहर्ता आहे आणि आम्ही त्या प्रतिष्ठेला सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करतो.

टाटांनी शांतनूच्या स्टार्टअपमध्ये काही रक्कम गुंतवली त्यामुळे त्याची कंपनी देशभरातील विविध शहरांमध्ये विस्तारात आहे. गुडफेलोजने गेल्या बीटा पूर्ण केला आहे. सध्या ते मुंबईत उपलब्ध आहे. बीटा चाचणी टप्प्यादरम्यान, स्टार्टअपला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. गुडफेलोजमध्ये रुजू होण्यास इच्छुक असलेल्या ८०० हून अधिक युवा पदवीधरांचे अर्ज कंपनीकडे आले, ज्यातून निवडण्यात आलेल्या २० जणांच्या तुकडीने मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना सोबत केली असल्याचे शांतनू नायडू सांगतो.

 

Previous Post

इथे घडणार उद्याचे खगोलशास्त्रज्ञ

Next Post

अभिमानास्पद…अमेरिकन मुलाने गायले राष्ट्रगीत

Admin

Admin

Next Post
अभिमानास्पद…अमेरिकन मुलाने गायले राष्ट्रगीत

अभिमानास्पद...अमेरिकन मुलाने गायले राष्ट्रगीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.