• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

रस्त्यांवरील खड्डे बुजवून ते वाचवित आहेत लोकांचे प्राण

पंजाबचे हरमिंदर सिंग यांचा कृतीशील आदर्श

Admin by Admin
June 8, 2026
in Positive news
0
रस्त्यांवरील खड्डे बुजवून ते वाचवित आहेत लोकांचे प्राण

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-

आजची चांगली बातमी आहे पंजाबहून…

आपली एक छोटीशी कृतीसुद्धा सकारात्मक परिणाम घडवून आणत असते. गेल्या अनेक वर्षांपासून लुधियाना (पंजाब) येथील ७५ वर्षीय निवृत्त बँक कर्मचारी हरमिंदर सिंग रस्त्यांवरील खड्डे बुजवून लोकांचे प्राण वाचवत आहेत. खड्डे बुजविण्याकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने, त्यांनी स्वत:च्या खिशातून व स्थानिक लोकांकडून गोळा केलेल्या विटा, फरशा आणि बांधकामाच्या भंगाराचा वापर करून रस्ते दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिथे अनेक लोक खड्डे टाळून पुढे निघून जातात, तिथे हरमिंदर सिंह ते खड्डे भरून काढण्यासाठी पुढे सरसावतात. दुचाकीस्वरांचा आणि वाहन चालकांचा खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांपासून जीव वाचविणे हा त्यांचा उद्देश आहे. ते मॉडेल टाऊन, पखोवाल रोड आणि शहीद भगतसिंग नगर आणि आसपासच्या भागांतील खड्डे बुजवित आहेत. म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या झोन डी कार्यालयाजवळ खड्डे भरतानाचा त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि ते प्रकाशझोतात आले.

75 वर्षांच्या वयात ते केवळ रस्ते सुधारत नाही, तर हेही दाखवून देते की बदलाची सुरुवात कोणत्याही मोठ्या पदामुळे किंवा अधिकारामुळे होत नाही, तर एका छोट्या कृतीतून होते. जेव्हा अनेक लोक समस्यांबद्दल तक्रारी करत असतात, तेव्हा हरमिंदर सिंह मात्र त्या समस्येच्या समाधानाचा भाग बनत आहेत. अशा व्यक्तीच आपल्या शहरांना अधिक चांगले बनवतात आणि समाजाला प्रेरणा देतात. त्यांचे कार्य आपल्याला शिकवते की समाजातील सकारात्मक बदलासाठी इच्छाशक्ती, जबाबदारीची जाणीव आणि कृती करण्याची तयारी यांचीच सर्वाधिक गरज असते.

Previous Post

वयाच्या 86 व्या वर्षी बनविल्या 11 प्रकारच्या सायकली

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.