• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

भारतीय रेसिंग विश्वातला नवा चमकता तारा – सार्थक चव्हाण

Admin by Admin
February 3, 2025
in my news pune
1
भारतीय रेसिंग विश्वातला नवा चमकता तारा – सार्थक चव्हाण

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून

अवघ्या १७ वर्षांच्या सार्थक चव्हाणने मोटारसायकल शर्यतीच्या क्षेत्रात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी केली आहे. ‘इंडियन नॅशनल मोटरसायकल रेसिंग चॅम्पियनशिप-२०२४’ मधील ‘प्रो स्टॉक ३०१-४०० सीसी’ या खुल्या श्रेणीतील सर्वात तरुण राष्ट्रीय विजेता बनण्याचा विक्रम सार्थकने नुकताच केला आहे. या कामगिरीसह सार्थकने १५० ते ४०० सीसी इंजिन क्षमतेच्या मोटारसायकल श्रेणीमध्ये तब्बल १७ शर्यती जिंकल्या आहेत. सार्थकच्या या यशामुळे देशातील सर्वांत तेजस्वी तरुण खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची ओळख झाली आहे.


सदाशिव पेठेत राहणाऱ्या सार्थकच्या कुटुंबात दुचाकी शर्यतीचे वातावरण त्याच्या जन्माच्या आधीपासून होते. कॅम्प येथील रोझरी हायस्कूल येथे सार्थकने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तो सध्या नऱ्हे येथील ‘भिवराबाई सावंत अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयात’ सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. सार्थकचे वडील श्रीकांत चव्हाण यांनी देखील अनेक स्पर्धा गाजविल्या. सार्थकने पण याच क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचावे, अशी त्यांची इच्छा होती.


याच अनुषंगाने कात्रजमधील मांगडेवाडी येथील ‘आर. एस मोटर्स’ या त्यांच्या वर्कशॉपमध्ये सार्थकने सराव सुरू केला. अवघ्या सहा वर्षांचा असताना २०१२ मध्ये मुंबईतील ‘आयलंड रेस’ स्पर्धेत सार्थकने आठ वर्षांच्या खालील वयोगटात तिसरा क्रमांक पटकाविला. त्यानंतर सार्थकने राष्ट्रीय स्तरावर अनेक ‘डर्ट ट्रॅक’ आणि ‘रोड रेस’ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला.
सार्थकच्या या यशामुळे ‘एमआरएफ’ आणि ‘टीव्हीएस’ या कंपन्यांनी त्यांच्या दुचाकी शर्यत संघात त्याची निवड केली. त्यानंतर २०२२ ते २४ या कालावधीत सार्थकने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.
पहिल्या ‘दहा’ मध्ये प्रभावी कामगिरी केली.


आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्यासाठीचा परवाना सार्थकला मिळाल्यानंतर अमेरिकेतील जॉर्जिया येथे २०१५ मध्ये ‘मिलिसेप्स ट्रेनिंग फॅसिलिटी’ मध्ये एका महिन्याचे प्रशिक्षण त्याने घेतले. त्यानंतर दुबई येथे २०१७ मध्ये आयोजित ‘मोटोक्रॉस रेस’ स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळविला. २०१९ मध्ये ‘फिलिपिन्स’ येथे ‘आशिया मोटोक्रॉस चॅम्पियनशिप’ स्पर्धेत सार्थकने सातवा क्रमांक मिळविला आणि पहिल्या दहा स्पर्धकांमध्ये पोहचणारा तो पहिला भारतीय ठरला.


याविषयी सार्थकचे वडील श्रीकांत चव्हाण म्हणतात, सार्थकने इतक्या कमी वयात जे यश मिळविले आहे त्याचा मला अभिमान आहे. दुचाकी शर्यतीच्या क्षेत्रात त्याने देशाचा नावलौकिक वाढवावा आणि या क्षेत्रात अतुलनीय यश मिळवावे, हे माझे स्वप्न आहे.
याविषयी सार्थक चव्हाण म्हणतो, माझ्या आयुष्याला योग्य वळण देण्यामध्ये माझ्या कुटुंबाचा आणि विशेष करून माझ्या वडिलांचा मोठा वाटा आहे. आगामी काळात ‘आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशिप’ आणि ‘मोटोजीपी-३’ सारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून देशाची प्रतिष्ठा वाढविण्यात आपले योगदान द्यायचे आहे.

सार्थक चव्हाण भारतातील एकमेव रायडर आहे ज्याने रोड रेसिंग, सुपरक्रॉस रेसिंग, दर्ट ट्रॅक या तीन फॉरमॅट मध्ये प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

आजवर जिंकलेल्या स्पर्धा
* १२ व्या वर्षी ज्युनिअर नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियन
* १३ व्या वर्षी भारतातील रोड रेसिंग मधील प्रिमियम होंडा एन एस एफ २५० चा चॅम्पियन
* १४ व्या वर्षी थायलंड टॅलेंट कप मध्ये पोडियम मिळवणारा पहिला भारतीय.
* १५ व्या वर्षी आशिया टॅलेंट कप सिलेक्शन आणि टॉप १० मध्ये येणारा पहिला भारतीय.
* १६ व्या वर्षी ब्रिक रोड रेसिंग चॅम्पियनशिपमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा पहिला भारतीय
* १७ व्या वर्षी आशिया टॅलेंट कपमधील टॉप ५ मध्ये येणारा पहिला भारतीय.
* १७ व्या वर्षी इंडियन नॅशनल रोड रेसिंग प्रो स्टॉक ३१० सी ,सी ऑल इंडिया चॅम्पियन.
* १७ व्या वर्षी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक बाईक चॅम्पियनशिप मध्ये ५ रेस मध्ये 5५ ही रेस प्रथम क्रमांक मिळवत ऑल इंडिया चॅम्पियन .
* १७ व्या वर्षी भारतातील सारवण फास्टेस्ट टाईम करणारा पहिला रायडर .
* १७ व्या वर्षी भारतातील मनाची प्रो स्टॉक चॅम्पियन होणारा सर्वात लहान रायडर.
* १७ व्या वर्षी आशिया रोड रेसिंग टी,व्ही,एस वण मेक चॅम्पियनशिप मध्ये ३ रा येणारा पहिला भारतीय
* १७ व्या वर्षी इंडियन सुपर क्रॉस लीग मध्ये 3 रा क्रमांक मिळाविणारा एकमेव भारतीय.

Previous Post

दुष्काळी गावाला पाणीदार करणारा अवलिया!

Next Post

ऐक, एक गोष्ट सांगतो स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ’शब्दसारथी’च्या वतीने यशस्वी आयोजन

Admin

Admin

Next Post
ऐक, एक गोष्ट सांगतो स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ’शब्दसारथी’च्या वतीने यशस्वी आयोजन

ऐक, एक गोष्ट सांगतो स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! ’शब्दसारथी’च्या वतीने यशस्वी आयोजन

Comments 1

  1. तुषार says:
    1 year ago

    खूपच छान, रेसिंग विश्वामध्ये संजय टकले या मराठी व्यक्तीचे नवा सोडले तर आत्तापर्यंत कोणीच समोर आले नाही किंवा प्रसिद्धीमध्ये आले नाही. हे दोन्ही रेसिंग प्रकार वेगळे आहेत पण आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला मराठी ध्वज फडकत ठेवणे हे खूपच अवघड काम आहे.
    सार्थक तुझे अभिनंदन आणि तुला भविष्यातील या खेळाच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.