• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पूरग्रस्तांसाठी भाजी विक्रेत्याचे ‘लाख’मोलाची मदत

Admin by Admin
September 30, 2025
in Inspirational
0
पूरग्रस्तांसाठी भाजी विक्रेत्याचे ‘लाख’मोलाची मदत

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे पुण्याहून
शनिपार चौकातील पदपथावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या चरण वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल एक लाख १३ हजार ७४० रुपयांची मदत दिली.
कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश वनवे यांनी सुपूर्त केला.
चरण वनवे हे शंकर महाराजांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांच्या घरातील महाराजांच्या पादुकांसमोर त्यांनी एक डबा ठेवलेला आहे. भाजी विक्रीतून आलेल्या रकमेपैकी दररोज शंभर रुपये ते या डब्यामध्ये साठवतात. आपदग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशानेच ही बचत केली जाते.
याविषयी चरण वनवे म्हणाले, ‘आमची तिसरी पिढी भाजी विक्रीचा व्यवसाय करते. माझ्या आईने कोरोनाच्या काळात गरजवंतांना एक लाख रुपयांची मदत केली होती. आपल्याकडील पैसा हा इतरांच्या कामाला यावा अन्यथा तो दुःखाचा डोंगर आहे, अशी आईची शिकवण होती. तिच्या पश्चात मी हा वारसा पुढे नेत असून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने दररोज शंभर रुपये बाजूला ठेवत आलो आहे. आज समाजाची गरज लक्षात घेऊन मी खारीचा वाटा उचलला आहे.’
यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, अत्यंत गरीब परिस्थितीतही आपण समाजाचे काही देणे लागतो या नात्याने वनवे यांनी केलेली मदत लाख मोलाची आणि समाजाला प्रेरित करणारी आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने कसबा मतदार संघातील अभियानाचा आम्ही आज यानिमित्ताने शुभारंभ केला. अधिकाधिक नागरिकांनी पूरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

Previous Post

सकस, कसदार लेखनशैलीचे साहित्य वाचनीय

Next Post

इच्छेपुढे गगनही ठेंगणे

Admin

Admin

Next Post
इच्छेपुढे गगनही ठेंगणे

इच्छेपुढे गगनही ठेंगणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.