• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

पुणेकरांसाठी गुड न्यूज, दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच 

Admin by Admin
September 21, 2024
in my news pune
0
पुणेकरांसाठी गुड न्यूज, दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा लवकरच 

स्वदेस न्यूज(प्रतिनिधी):-

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून

पुण्यातून आता लवकरच नवीन दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार आहेत. पुणेकरांसाठी ही खुशखबर असणार आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भातील माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय विमान सेवेमुळे पुणे शहर व पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

दोन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता पुणे शहर आणि परिसरासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्यात आल्या आहेत. २७ ऑक्टोबर २०२४ पासून या दोन नवीन विमानसेवा सुरु होणार आहेत. यामध्ये पुणे-दुबई-पुणे अशी एक आंतरराष्ट्रीय विमानसेवा असणार आहे. तर दुसरी पुणे-बँकॉक-पुणे अशी आंतरराष्ट्रीय विमानसेवा असणार आहे.

दरम्यान, सध्या पुणे विमानतळाचे नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्याचेही काम पूर्ण झाल्यामुळे विमानसेवेला फायदा होणार आहे. तसेच पुणे विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता पुणे-दुबई आणि पुणे- बॅंकॉक थेट विमानसेवा सुरु करण्यात आल्यामुळे प्रवाशांना या विमानसेवेचा लाभ होणार आहे.

पुणेकरांसाठी महत्त्वाचा निर्णय
“पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी दोन नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणे येत्या २७ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होत असून यात पुणे-दुबई-पुणे आणि पुणे-बँकॉक-पुणे या मार्गांचा समावेश आहे. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे”, असे मुरलीधर मोहोळ यांनी एक्सवरील (ट्विटर) पोस्टमध्ये सांगितले आहे.

Previous Post

आत्मयोगगुरू डाॅ. संप्रसाद विनोद यांचा योग पुरस्काराने गौरव 

Next Post

प्रत्येक गाव कवितेचं करण्यासाठी ते फिरतायत अनवाणी!

Admin

Admin

Next Post
प्रत्येक गाव कवितेचं करण्यासाठी ते फिरतायत अनवाणी!

प्रत्येक गाव कवितेचं करण्यासाठी ते फिरतायत अनवाणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.