• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेचा विशेष सन्मान

Admin by Admin
February 11, 2025
in my news pune
0
नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट साहिल मरगजेचा विशेष सन्मान

स्वदेस न्यूज ः जिमनॅस्टिकमधील उल्लेखनीय कामगिरी बद्दल दोन वेळा नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट म्हणून नावलौकिक मिळवलेल्या धनकवडी येथील साहिल मरगजे यांचा आयपीएस अधिकारी व अँटी करप्शन ब्युरोचे अतिरिक्त महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

चिंतामणी ज्ञानपीठ व अप्पा रेणुसे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऐश्वर्य व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पर्वात ‘कर हर मैदान फतेह’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना नांगरे पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या वेळी नृत्यांगना स्वप्ना कुंभार, खेळाडू आलोक मनोज तोडकर आणि सायंटिस्ट आदेश फलफले यांनादेखील गौरवण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष अप्पा रेणुसे, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, उद्योजक विजयशेठ जगताप, अभय मांढरे, विलासराव भणगे, नेमीचंद सोळंकी, शंकरराव कडू, युवराज रेणुसे, अँड. दिलीप जगताप, सचिन डिंबळे, सर्जेराव शिळीमकर, प्रदीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

साहिलचे प्राथमिक शिक्षण प्रियदर्शनी इंग्लिश स्कूल मध्ये झाले असून आता तो द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. साहिल मागील दहा वर्षांपासून जिमनॅस्टिकचा सराव करत आहे. यापूर्वी साहिल ने २०१९ मध्ये दिल्ली येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक तसेच २०२३ मध्ये केरळ येथील नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला असून नॅशनल चॅम्पियन जिमनॅस्ट म्हणून नावलौकिक मिळविला आहे. सध्या तो बिबवेवाडी येथील एस के जिमनॅस्टिक्स मध्ये राष्ट्रीय प्रशिक्षक सौरभ कोकाटे यांच्या मार्गदर्शना खाली जिमनॅस्टिकचे प्रशिक्षण घेत आहे.

Previous Post

आधुनिक सावित्रीने वाचवले पतीचे प्राण…पतीला वाचवण्यासाठी पत्नीची ४० फूट विहिरीत उडी

Next Post

Admin

Admin

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.