• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

… होय तुम्हीच ‘मायमराठीच्या खऱ्या शिलेदार!

Admin by Admin
March 2, 2025
in my news pune
0
… होय तुम्हीच ‘मायमराठीच्या खऱ्या शिलेदार!

मराठी शिकवणाऱ्या शिक्षिकांचा ‘शब्दसारथी’तर्फे विशेष सन्मान

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) ः

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

(प्रतिनिधी) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना या मराठीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम करणाऱ्या मराठी विषयाच्या शिक्षिकांना ‘मराठीचे खरे शिलेदार’ म्हणून सन्मानित करण्यात आले. अनंत अडचणींतून वाट काढत टिकून राहिलेल्या आणि गुणवत्ता राखलेल्या मराठी शाळांना या वेळी मानवंदना देण्यात आली.


मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दसारथी’च्या वतीने विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, नव्या पिढीचे दमदार लेखक नितीन थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. मनिषा पोतदार आणि शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार व्यासपीठावर उपस्थित होते.


ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मराठी विषयीच्या शिक्षिका अश्विनी जोशी, जयश्री काटीकर, गोळवलकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने आणि शिक्षिका माधुरीताई बापट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका कांचन सोलापूरकर, चिंतामणी ज्ञानपीठातील मराठी शाळेच्या शिक्षिका मीनाक्षी ज्योतिक, प्रियदर्शनी शाळेच्या मराठी भाषेच्या शिक्षिका नीता बाबर यांना यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला आणि सन्मानपत्र, शाल देऊन गौरवण्यात आले. शब्दसारथीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.


या वेळी अभय कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांचे कौतुक आणि शिक्षकांचा गौरव करण्याची ‘शब्दसारथी’ची कल्पना उत्तम आहे. अशा स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद आणि पालकांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा आहे.
नितीन थोरात म्हणाले, गोष्ट सांगण्याची ऊर्मी प्रत्येकामध्ये असते. आपण आपल्यातील लहान मूल कायम जिवंत ठेवायला हवे. त्यासाठी सगळ्या मुलांनी आपल्या पालकांसमवेत बसून गोष्ट फुलवण्याचा खेळ एकत्रित बसून खेळायला हवा.


प्रास्ताविक शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नगंधा वस्ते यांनी केले. मनिषा पोतदार यांनी आभार मानले.

राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांचे यावेळी गौरवचिन्ह, पदके, सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी पुण्याच्या कानाकोपऱ्यातून आणि बाहेरगावाहून अनेक लोक आवर्जून उपस्थित राहिले होते.

Previous Post

‘महाराष्ट्र केसरी’सुद्धा रमला ‘ऐश्वर्य कट्ट्या’वर …!

Next Post

पॉझिटीव्ह मॉर्निंग..

Admin

Admin

Next Post
पॉझिटीव्ह मॉर्निंग..

पॉझिटीव्ह मॉर्निंग..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.