• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अमेरिकेतही मायमराठीचा डंका

Admin by Admin
August 16, 2025
in Success Story
0
अमेरिकेतही मायमराठीचा डंका

अमेरिकेचे पहिले मराठी आमदार संतोष साळवी चालवत आहेत मराठी शाळा
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे गुहागर मधून
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्यावतीने मेदवारी लढविलेल्या गुहागर तालुक्यातील जामसूत येथील संतोष साळवी हे बोस्टन जवळील न्यू हम्पशेअर स्टेटचे पहिले मराठी आमदार झाले आहेत. एका मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवून ऐतिहासिक विजय मिळविल्याने त्यांचा जामसूत ग्रामस्थ, ग्रामपंचायत, ग्रामदेवता देवस्थान व गुहागर तालुका मराठा समाजातर्पेâ नुकताच सन्मान करण्यात आला.
संतोष साळवी हे फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. येथे नोकरी करीत असतानाच त्यांना अमेरिकन क्षितिज खुणावू लागले. १९९४ ला ते अमेरिकेत गेले व सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत झाले. खूप कष्ट करून प्रगतीच्या नवनव्या वाटा शोधू लागले. मुळातच समाजसेवेची आवड असल्याने साळवी येथील भारतीय आणि अमेरिकन समाजाशी चांगलेच एकरूप झाले.
दरम्यान, त्यांचा सॉफ्टवेअर इंजिनिअरचा जॉब गेला. पण खचून न जाता त्यांनी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली. अमेरिकेत राहून करिअर करीत असतानाच अमेरिकेतील जे लोक वयाच्या चाळीशीमध्येच योग्य त्या ज्ञानाअभावी नोकरी गमावून बसतात, पदरी लहान मुले असताना बेकार होतात त्यांना धीराचा हात देऊन आवश्यक ते शिक्षण देऊन नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचे काम त्यांनी सुरु केले. त्यांना नोकरी मिळवण्यायोग्य कसब मिळवून देत हजारो अमेरिकन लोकांचे आयुष्य पुन्हा मार्गस्थ करून दिले. इन्स्टिट्यूटचा पसारा वाढू लागला. पुणे, मुंबई, कॅनडा, बहरिन सर्वत्र आयटी स्टाफ ट्रेनिंग जोमात चालू झाले. याबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यदेखील वेगात चालू होते.
ते इंडियन असोसिएशनचे प्रेसिडेंट झाले. रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँक चालवणे, गरजू रुग्णांना तत्परतेने रक्त पुरवणे असे उपक्रम राबविणे त्यांनी सुरु केले. सुमारे १२० गरीब लोकांना त्यांची समाजसेवी संघटना मोफत जेवण देते. गेली २० वर्षे संतोष साळवी जॉब ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत आहेत. ते बृहन्महाराष्ट्र अमेरिका संस्थेचे खजिनदार आहेत. या संस्थेतर्पेâ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि सर्व सण उत्साहाने साजरे करण्यात येतात. अमेरिका, कॅनडामधील सर्वोच्च असणार्‍या या संस्थेचे खजिनदार म्हणून ते चांगलेच लोकप्रिय आहेत.

दरम्यान अमेरिकेची निवडणूक घोषित झाली आणि साळवी यांना ती निवडणूक लढविण्यासाठी आग्रह होऊ लागला. आयुष्याची वाटचाल करताना ज्या धाडसाने आणि निर्भयपणे त्यांनी पावले टाकली. या निवडणुकीत देखील ते यशस्वी झाले आणि अमेरिकेतील पहिले मराठी आमदार झाले.
व्हाईट हाऊसमधून मिळताहेत मानाची निमंत्रण
संतोष साळवी हे अमेरिकेत सात मराठी शाळा चालवत आहेत. अमेरिकेतील आपल्या मराठी मुलांवर मराठी भाषेचे, संस्कृतीचे सर्वोत्तम संस्कार व्हावे यासाठी ते झटत आहेत. त्यांच्या या समाजसेवेची दखल अमेरिकन सरकारने देखील घेतली. त्यांना सर्वोच्च अशा व्हाईट हाऊसमधून मानाची निमंत्रणे येऊ लागली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीप्रसंगी विशेष निमंत्रित म्हणून बोलावले जाऊ लागले. भारतातून अमेरिकेत एम. एस. करायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या समितीत ते काम करू लागले.

Previous Post

भारताची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू

Next Post

वारे गुरुजींची कमाल ; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा

Admin

Admin

Next Post
वारे गुरुजींची कमाल ; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा

वारे गुरुजींची कमाल ; उजाड माळरानावर उभारली आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.