• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

वर उचलला जाणारा देशातील पहिला सागरी पूल!…

Admin by Admin
April 7, 2025
in Success Story
0
वर उचलला जाणारा देशातील पहिला सागरी पूल!…

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) : 
आजची चांगली बातमी आहे रामेश्वरमहून

वास्तुशिल्पातील एक चमत्कार म्हणून ज्याकडे पाहिले जाते असा वर उचलला जाणारा देशातील पहिला सागरी पूल तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे साकारण्यात आलेला आहे. भारतातील या पूलाकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पांबन या समुद्री पूलाचे उद्घाटन करण्यात आले.

रेल्वेच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्प म्हणून पांबन पूलाकडे पाहिले जाते आहे. हा पूल केवळ तांत्रिक कामगिरीच नाही तर तमिळ संस्कृती, भाषा आणि प्राचीन सभ्यतेच्या वारश्याशीही घट्ट जोडलेला आहे. पांबन पुलाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, तमिळ इतिहास आणि संस्कृतीशी घट्ट नाते सांगणारा आणि एक महान वास्तुशिल्प चमत्कार म्हणजे हा पूल आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा पूल आहे. तो भारताला समर्पित केला गेला आहे. 1914 मध्ये बांधलेला जुना पांबन पूल खराब झाला होता. यामुळे डिसेंबर 2022 मध्ये तो पूल बंद करण्यात आला. आता नव्या तंत्रज्ञानाने त्याची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. 550 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला. या नवीन पुलावर पॉलीसिलॉक्सेन कोटिंग बसवण्यात आले आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे होणाऱ्या गंजापासून पुलाचे संरक्षण होईल.


समुद्रावर बांधलेला हा भारतातील पहिला उभा लिफ्ट पूल आहे. हा पूल 2.08 किलोमीटर लांबीचा आहे आणि त्यात 99 स्पॅन आणि 72.5 मीटर लांबीचा लिफ्ट स्पॅन आहे. जे 17 मीटरपर्यंत वाढू शकतो, ज्यामुळे मोठी जहाजे आरामात जाऊ शकतात. स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मजबुतीकरण आले आहे.

पांबन पूल रामेश्वरमला मुख्य भूभागाशी जोडतो. त्याच ठिकाणी रामायणानुसार रामसेतूच्या बांधकामाला सुरुवात झाली. रेल्वे विकास निगम लिमिटेडद्वारे या पुलाची निर्मिती करण्यात आली. या पुलाला 2019 मध्ये रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती.

Previous Post

आता राज्यभर सुरू होणार ‘बाइक टॅक्सी’

Next Post

शेतीतही होणार आता ‘एआय’ची पेरणी!

Admin

Admin

Next Post
शेतीतही होणार आता ‘एआय’ची पेरणी!

शेतीतही होणार आता ‘एआय’ची पेरणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.