• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

डॉ. पार्थिवन… ‘डिग्रींचं चालतं-बोलतं संग्रहालय’

Admin by Admin
October 28, 2025
in Inspirational
2
डॉ. पार्थिवन… ‘डिग्रींचं चालतं-बोलतं संग्रहालय’

वचनपूर्तीसाठी घेतला विद्यार्जनाचा ध्यास
स्वदेस न्यूज (प्रतिनिधी):-
आजची चांगली बातमी आहे चेन्नईहून
एका परीक्षेत व्ही. एन. पार्थिवन काठावर पास झाले. त्यांच्या गुणपत्रिकेवरील गुण पाहून त्यांची आई दुःखी झाली. हा क्षण त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. आईला दिलेल्या वचनासाठी चार दशके विद्यार्जनाचा ध्यास कायम ठेवत प्रोफेसर डॉ. व्ही. एन. पार्थिवन यांनी तब्बल १५० हून अधिक पदव्या मिळविल्या आहेत. त्यामुळेच त्यांना ‘डिग्रींचं चालतं-बोलतं संग्रहालय’ म्हटलं जात. हे यश संपादन केल्यानंतर आता २०० पदव्यांचा टप्पा ओलांडणे हे त्यांचे ध्येय बनले आहे.
१२ एम.फिल.,चार पीएच.डी
१९८१ पासून त्यांनी एकामागोमाग एक परीक्षा देण्यास सुरवात केली. एका परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करण्याचे ध्येय म्हणून सुरू झालेले शिक्षण ज्ञानाच्या अतृप्त तहानमध्ये रूपांतरित झाले. त्यांच्याकडे अर्थशास्त्र, लोकप्रशासन, राज्यशास्त्र आणि कायदा यांसारख्या विषयांमध्ये अनेक पदव्युत्तर पदव्या आहेत. त्यांच्याकडे १२ एम.फिल.पदव्या आहेत आणि ते चौथी पीएच.डी. करत आहेत. प्राध्यापक पार्थिवन त्यांच्या पगाराची ९०टक्के रक्कम शिक्षणावर खर्च करतात. यामध्ये विद्यापीठ शुल्क, पुस्तके आणि अभ्यास साहित्य समाविष्ट आहे. त्यामुळे त्यांना प्रेमाने ‘डिग्रींचं चालतं-बोलतं संग्रहालय’ देखील म्हंटले जाते.
फावल्या वेळेतील प्रत्येक मिनिट अभ्यासासाठी समर्पित असलेल्या प्राध्यापक पार्थिवन यांचा दिवस पहाटे सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत अनेक संस्थांमध्ये शिकविण्यात जातो. व्याख्यानांमधील प्रत्येक मोकळा मिनिट त्यांच्या स्वतःच्या अभ्यासासाठी समर्पित असतो. इतर जण आराम करू शकतात, पण त्यांचे अध्ययन सुरू असते.
आपल्या शैक्षणिक ध्यासाविषयी बोलताना पार्थिवन म्हणतात की, निर्बंध आपण स्वतःहून आपल्या मनावर लादत असतो. जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीसाठी प्रेरित असता तेव्हा तुम्ही काय साध्य करू शकता याला मर्यादा नसतात. आजही आपला शिक्षणाचा प्रवास संपलेला नाही.
भारतासारख्या देशात उच्च शिक्षण हे अनेकांसाठी एक स्वप्न असते. तिथे प्राध्यापक पार्थिवन तरुणाईसह सर्वांसाठीच प्रेरणास्थान बनले आहेत.

Previous Post

बैजू पाटील यांनी पटकाविले रौप्य पदक

Next Post

दीड लाख झाडांचे यशस्वी स्थलांतर

Admin

Admin

Next Post
दीड लाख झाडांचे यशस्वी स्थलांतर

दीड लाख झाडांचे यशस्वी स्थलांतर

Comments 2

  1. Deepak Kale says:
    7 months ago

    व्वा, विलक्षण, व्रत की व्यसन वाटावे असे आहे.

    Reply
  2. Kishor Prakash Dhage says:
    7 months ago

    👏

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.