• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरात घुमले बालस्वर!

Admin by Admin
August 27, 2024
in Positive news
0
अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरात घुमले बालस्वर!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :

आजची चांगली बातमी आहे पुण्यातून…

अयोध्येतील रामलल्लाच्या मंदिरामध्ये एक अनोखा सोहळा आज अनुभवायला मिळाला. पुण्यातून गेलेल्या ८० बालकलाकारांनी तिथे गीत रामायण सादर केले. त्यामुळे रामलल्लाचे मंदिर आणि परिसर बालस्वरांनी भरून गेल्याचा उत्कट अनुभव उपस्थितांना आला.

पुण्यातील ८० बाल कलाकारांनी अयोध्या स्थित प्रभु श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्व. ग. दि. माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

पुण्यातील ‘स्वरतरंग संगीत अकादमी’ तर्फे बाल कलाकारांच्या गटासह होणारा व अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम होता आणि असा कार्यक्रम सादर करण्याचा मान पुण्यातील बाल कलाकारांना लाभला.
दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या गायन कार्यक्रमात बाल कलाकारांनी गीतरामायणातील निवडक १६ सुमधुर गाणी सादर केली. त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. साथसंगत व्हायोलिनवर रमाकांत परांजपे, ईरा परांजपे, हार्मोनियमवर जयंत साने व मालती बेहेरे, तबल्यावर अभिजित जायदे, संतोष वैद्य तर तालवाद्यावर प्रसाद भावे यांनी केली.

कार्यकमास राममंदिर ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे, माधुरी आफळे, एल अँड टी मंदिर बांधकाम कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सतीश चव्हाण, श्रीराम मंदिर प्रकल्पाचे व्यवस्थाप्रमुख फुलचंद मिश्रा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. यावेळी बाल कलाकारांचे पालक, महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी श्रीराममंदिराचा पूर्व इतिहास व उभारणीसंबंधीचे सादरीकरण करून या प्रकल्पाविषयी सर्व माहिती पालक व भाविकांसमोर सविस्तर मांडली. याआधी पुण्यात ‘स्वरतरंग संगीत अकादमी’ तर्फे गीत रामायण, बालमुखातून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध विषयावरील सामुहिक सादरीकरणाचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.

Previous Post

पुणेकरांनी पुन्हा एकदा अनुभवले उत्साहाने झपाटलेले झाड!!

Next Post

दोन्ही हात नसताना ती सज्ज झालीये सुवर्णवेध करण्यासाठी…  

Admin

Admin

Next Post

दोन्ही हात नसताना ती सज्ज झालीये सुवर्णवेध करण्यासाठी...  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.