• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

जिद्दीच्या जोरावर लाखो मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश!

सफिना हुसेन यांच्या ‘एज्युकेट गर्ल्स’चा जागतिक सन्मान

Admin by Admin
November 27, 2026
in Inspirational
0
जिद्दीच्या जोरावर लाखो मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे दिल्लीहून

एखाद्या मुलीला शिक्षणाची संधी मिळाली, तर केवळ तिचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचे भविष्य बदलू शकते. हाच विचार मनाशी बाळगून भारतातील लाखो वंचित मुलींच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचवणाऱ्या सफिना हुसेन यांनी आपल्या कार्यातून सामाजिक परिवर्तनाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या स्वयंसेवी संस्थेला २०२५ चा प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारी ‘एज्युकेट गर्ल्स’ ही पहिली भारतीय ना-नफा संस्था ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे भारतीय सामाजिक कार्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली आहे.

दिल्लीमध्ये १९७१ मध्ये जन्मलेल्या सफिना हुसेन यांचे बालपण अनेक अडचणींमध्ये गेले. घरगुती हिंसा, गरिबी आणि कौटुंबिक अस्थिरतेमुळे त्यांना एकेकाळी शिक्षण सोडावे लागले. मात्र, एका आत्याने त्यांना आधार देत पुन्हा शिक्षणाची संधी मिळवून दिली. याच अनुभवाने त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. दिल्ली पब्लिक स्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली. पुढे परदेशात नोकरी करण्याऐवजी समाजकार्याचा मार्ग निवडला. लॅटिन अमेरिका आणि आफ्रिकेतील विविध सामाजिक प्रकल्पांमध्ये काम करताना मुलींच्या शिक्षणातील अडथळे त्यांनी जवळून अनुभवले.

यातूनच २००७ मध्ये ‘एज्युकेट गर्ल्स’ या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला केवळ ५० शाळांमधून स्वतःच्या खर्चाने सुरू झालेल्या या उपक्रमाने हळूहळू मोठे स्वरूप धारण केले. राजस्थान सरकारने त्यांच्या कामाची दखल घेत संस्थेला अधिक शाळांमध्ये काम करण्याची संधी दिली.

आज राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील ३० हजारांहून अधिक गावांमध्ये संस्था कार्यरत आहे. संस्थेने आतापर्यंत २० लाखांहून अधिक मुलींना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणले असून, लाखो मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठीही योगदान दिले आहे. ‘टीम बालिका’ या उपक्रमांतर्गत स्थानिक स्वयंसेवक घराघरांत जाऊन पालकांचे समुपदेशन करतात आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात.

१५ ते १९ वयोगटातील युवतींसाठी सुरू केलेल्या ‘प्रगती’ उपक्रमातूनही हजारो मुलींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळाली आहे. सफिना हुसेन यांच्या कार्याचा गौरव यापूर्वी २०२३ मध्ये कतार फाउंडेशनच्या ‘व्हाईस प्राइझ’ पुरस्कारानेही करण्यात आला. २०२६ मध्ये टाईम मासिकानेही त्यांच्या कार्याची दखल घेतली. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये जानेवारी २०२६ मध्ये त्यांचे ‘एव्हरी लास्ट गल्स : अ जरनी टू एज्युकेट इंडियाज फॉरगॉटन डॉटर’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

आगामी २०३५ पर्यंत देशातील एक कोटी वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मुलींचे शिक्षण हा केवळ सामाजिक उपक्रम नसून त्यांचा मूलभूत अधिकार आहे, हा विचार समाजात रुजवण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.

सफिना हुसेन यांचा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. स्वतः शिक्षणासाठी संघर्ष केलेल्या एका मुलीने आज लाखो मुलींच्या भविष्याला नवी दिशा दिली आहे. एका मुलीच्या शिक्षणातून संपूर्ण समाज बदलू शकतो, हा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून प्रत्यक्षात उतरवून दाखवला आहे.

Previous Post

हत्ती-गेंड्याच्या शेणापासून बनवल्या वह्या अन् डायऱ्या!

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.