• Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
Swades News
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us
No Result
View All Result
Swades News
No Result
View All Result

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांची जागतिक भरारी!

वन्यजीव छायाचित्रणात पटकावला ‘ऑस्कर’

Admin by Admin
October 23, 2026
in Success Story
0
बदलापूरच्या सिताराम राऊळ यांची जागतिक भरारी!
0
SHARES
0
VIEWS
Share on Facebook

 

स्वदेस न्यूज (प्रतिनिधी) :-
आजची चांगली बातमी आहे बदलापूरहून

निसर्गातील दुर्लक्षित जीवांचे सौंदर्य आणि त्यांच्या जगण्याचा संघर्ष आपल्या कॅमेऱ्यातून जगासमोर आणणाऱ्या बदलापूरच्या सिताराम दिनकर राऊळ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. लंडन येथील नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या वतीने आयोजित प्रतिष्ठित ‘वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ या जागतिक छायाचित्रण स्पर्धेत राऊळ यांनी ‘इनव्हर्टिब्रेट बिहेविअर’ या श्रेणीत विजेतेपद पटकावले आहे. जगभरातून प्राप्त झालेल्या ६५ हजारांहून अधिक छायाचित्रांमधून त्यांच्या छायाचित्राची निवड झाली.
वन्यजीव छायाचित्रणातील ‘ऑस्कर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील त्यांच्या यशामुळे बदलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सामान्यतः वन्यजीव छायाचित्रण म्हटले की वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या मोठ्या प्राण्यांची छायाचित्रे डोळ्यांसमोर येतात. मात्र, सिताराम राऊळ यांनी आपल्या कॅमेऱ्यातून आकाराने लहान; पण निसर्गचक्रात महत्त्वाचे स्थान असलेल्या जीवाचे अनोखे विश्व उलगडले आहे. राजस्थानातील जैसलमेर येथील वाळवंटात टिपलेल्या त्यांच्या पुरस्कारप्राप्त छायाचित्रात एक विंचू स्वतःसाठी वाळूत खड्डा खोदून निवारा तयार करताना दिसतो.

वाळवंटातील प्रतिकूल वातावरणात स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी जीवसृष्टी कशा प्रकारे परिस्थितीशी जुळवून घेते, याचे प्रभावी दर्शन या छायाचित्रातून घडते. निसर्गातील प्रत्येक जीवाच्या जगण्यामागे उत्क्रांतीतून विकसित झालेली कौशल्ये आणि संघर्ष दडलेला असतो, हा संदेश राऊळ यांच्या छायाचित्राने अधोरेखित केला आहे.

सिताराम राऊळ गेल्या १४ वर्षांपासून छायाचित्रण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना मॅक्रो फोटोग्राफी आणि क्रिएटिव्ह नेचर फोटोग्राफीची विशेष आवड आहे. व्यावसायिक छायाचित्रणाचा अनुभव आणि चित्रकलेची जाण यांचा सुंदर संगम त्यांच्या कलाकृतींमध्ये दिसून येतो. प्रकाश, रंग, रचना आणि निसर्गातील हालचाली यांचा अचूक मेळ साधत ते छायाचित्रांना वेगळे कलात्मक रूप देतात.

आपल्या यशामागे कुटुंबीय, आई-वडील, बदलापूर परिसरातील छायाचित्रकार मित्र आणि मार्गदर्शकांचे मोठे योगदान असल्याचे राऊळ मानतात. चित्रकलेचे गुरू सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाचाही त्यांच्या कलाप्रवासात महत्त्वाचा वाटा आहे. ‘स्केल अँड टेल्स कन्झर्वेशन’ संस्थेशीही ते संबंधित आहेत.

या जागतिक सन्मानामुळे विंचू, कीटक आणि इतर अपृष्ठवंशीय जीवांच्या जीवनाकडे तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या संरक्षणाकडे लक्ष वेधले जाण्याची अपेक्षा आहे. निसर्गातील लहान-मोठ्या प्रत्येक जीवाचे पर्यावरणीय व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे, हे आपल्या छायाचित्रणातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा राऊळ यांचा प्रयत्न आहे.निसर्गातील दुर्लक्षित पैलू जगासमोर आणण्याचे आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून निसर्गसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचे कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल बदलापूर परिसरातील नागरिक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post

जपानमध्ये चमकणार श्रीगोंद्याची श्रद्धा लोंढे

Admin

Admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Correction Policy
  • Editorial Policy
  • Fact-Checking Policy
  • Terms & Conditions

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • Positive news
  • Inspirational
  • Success Story
  • The Insight
  • Editorial
  • my news pune
  • Contact Us

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.